हिमायतनगर, अनिल मादसवार| महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या नावाची ग्रामीण भागातील युवावर्ग, लाडकी बहीण आणि जेष्ठ नागरिकासह शेतकरी वर्गात क्रेज (लोकप्रियता) निर्माण झाली आहे. कोणतेही पद नसताना विकास कामे खेचून आणणारा लोकनेता म्हणून मतदार जनता त्यांच्याकडे पाहते आहे. निवडनूक जवळ येत असल्याने प्रचाराने जोर पकडला असून, ठिकठिकाणच्या गावातून प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत आहे. येणाऱ्या २० तारखेला बाबुराव कदम कोहळीकर यांना प्रचंड मतांनी विजयी करून विधानसभेत पाठवा असे आवाहन समर्थक कार्यकत्यांकडून केले जात आहे. तर नुकतेच माजी खासदार सुभाषराव वानखेडे यांनी शिंदे गटात केलेल्या पक्षप्रवेशामुळे विजयाची वाट झाली मोकळी झाली असल्याचे मतदारातून बोलले जात आहे.
आगामी २० नोव्हेंबर २०२४ रोजी हदगाव – हिमायतनगर विधानसभा मतदार संघासाठी मतदान होणार आहे. जसजसे दिवस जवळ येताहेत तसं तसे प्रचाराची गती वाढली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून, हदगाव – हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागात समर्थक कार्यकर्त्याकडून गावोगावी जाऊन बाबुराव कदम कोहळीकर यांना निवडून आणण्याचे संगीत संचासह गृहभेटीतून मतदारांना विनंती केली जात आहे. बहुतांश गावामध्ये विरोधी पक्षाचे अनेक समर्थक कार्यकर्ते बाबुराव कदम कोहळीकर यांच्या विचाराने प्रभावित होऊन प्रवेश करत आहेत. तर भाजपकडून देखील अधिकृत उमेदवराला निवडून आणण्यासाठी पक्ष संघटनेत अनेकांचा प्रवेश करून घेत मताधिक्य वाढविण्यावर भर दिला गेला असल्याचे दिसून येत आहे.
कोणत्याही मोठ्या पदावर नसताना बाबुराव कदम कोहळीकर यांनी हदगाव- हिमायतनगर तालुक्यात कोट्यावधीच्या निधी मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्याकडून माजी खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या माध्यमातून खेचून आणला आहे. वंचीत असलेल्या घटकांना विशेषतः शेतकऱ्यांसह आणि गोरगरिबांच्या नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नावर महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांनी भर दिला आहे. आवश्यक असलेल्या ठिकाणी मोठा निधी उपलब्ध करून देत सर्व प्रकारचा विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे.
मागील काळात भर उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्याचा पाणी प्रश्न भीषण बनला होता त्यावेळी बाबुराव कदम कोहळीकर यांनी विदर्भ – मराठवाड्यातील शेतकऱयांच्या खांद्याला खांदा लावून इसापूर धरणातून पैनगंगा नदीत पाणी सोडविण्यासाठी थेट मंत्रालय गाठून पाणी मिळवून देत परिसरातील शेती सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न केले. पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत मिळवून देण्यापासून शेतकऱ्यांना पिक विम्याची मदत मिळवून देण्यासाठी मोठमोठे आंदोलने उभारली होती. शहर व ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देत आरोग्य शिबिरे आयोजित करून हजारो महिला – पुरुष नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या या सामाजिक कार्यामुळेच लोकप्रियता वाढली असून, ग्रामीण भागातील नागरिक बाबुराव कदम कोहळीकर यांच्या नावाला पसंती देत आहेत.
आतापयंत तीनदा बाबुराव कदम कोहळीकर यांनी निवडणूक लढविली असून, दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. कोणत्याही निवडणुकीत पराभवाने खचून न जाता सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी आपली लढाई सुरु ठेवत जणतेसमोर आले आहेत. जनतेप्रति असलेली त्यांच्यातील तळमळ ओळखून गावांमध्ये डोअर टू डोअर भेटी देण्यासाठी आलेल्या प्रचारकर्त्यांना गावकऱ्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मतदार संघाचा शाश्वत विकास साधण्यासाठी धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन दाबून विधानसभेत पाठविण्याचा निर्धार मतदारांनी केला असल्याचे दिसून येत आहे.
नुकतेच माजी खासदार सुभाषराव वानखेडे, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष विकास पाटील देवसरकर, बीआरएसचे गंगाधर पाटील चाभरेकर यांच्यासह अनेक दिग्गज लोकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटांमध्ये प्रवेश करून बाबुराव कदम कोहळीकर यांना निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडके जेष्ठ नागरिक, लाडके शेतकरी यासह विविध योजनांचा प्रभाव देखील मतदारांमध्ये अधिक झाला आहे. तसेच हिमायतनगर हदगाव तालुक्यात एमआयडीसी स्थापन करून बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचे आश्वासन खुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिमायतनगर येथील सभेदरम्यान दिला आहे. त्यांमुळे महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर त्यांच्या विजयाची वाट मोकळी झाली..! असे जनतेतून बोलले जात आहे.