क्राईमछत्रपती संभाजीनगरनांदेड

Sarsam Avidya abortion case : सरसम अवैद्य गर्भपात प्रकरणातील बोगस डॉक्टरचा अटकपुर्व जामीन औरंगाबाद हायकोर्टाने नाकारला -NNL

हिमायतनगर/नांदेड| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील सरसम येथे गैर मार्गाने अवैद्य रित्या गर्भपात करण्यात येत असल्याच्या माहिती वरून आरोग्य विभाग पोलिसांनी केलेल्या कारवाईतील आरोपीवर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील आरोपी फरार होता, त्याने जिल्हा व सत्र न्यायालय भोकर येथे अटकपुर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता परंतु न्यायालयाने सदर आरोपीचा अटकपुर्व जामीन नामंजुर केला पुढे तो छ.संभाजीनगर हायकोर्टात अटकपुर्व जामीना करीता गेला होता परंतु न्यायालयाने तेथेही जामीन नाकारला आहे.

सरसम येथिल सुरेखाई नगर भागात अवैद्य रित्य बनावट वैद्यकिय व्यवसायीका कडुन गर्भपात केला जात असल्याची माहिती काहि दिवसा पुर्वी सरसम प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी वैभव नखाते यांना मिळाली होती, बनावट वैद्यकिय व्यवसायीकाच्या हालचालीवर लक्ष ठेवुन असतांनाच दि. १३ ऑगष्टला या भागातील अवैद्य गर्भपाताचा संशय बळावल्याने सरसम प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. वैभव नखाते यांनी कारवाई केली दरम्यान संबंधितास सुगावा लागल्याने बनावट वैद्यकिय व्यवसाईकासह गर्भपात करण्याकरीता आलेल्या दोन महिला, एक मुलगी या ठिकाहुन पसार झाल्या.

संबंधीत घराची तपासणी केली असता गर्भपाता करीता वापरले जाणारे Mtp किट, भुल देण्याचे इंजक्शन, सर्जिकल साहित्य मिळुन आले डॉ. वैभव नखाते यांनी दिलेल्या फिर्यादि वरून प्रथम खबरी अहवाल क्र. २१३/२०२४ नुसार संशयीत आरोपी पंडीत काळुराम वाठोरे याचे विरूध्द भारतीय नागरीक सुरक्षा संहितेचे कलम ४८२, भारतीय न्याय संहितेचे कलम ८८ , ६३ , ३ (५) , महाराष्ट्र वैद्यकिय व्यवसायीक कायदा कलम ३३ (अ) , ३३ (२) नुसार गुन्हा दाखल झाल्या पासुन आरोपी फरार आहे, पोलिसां कडुन आरोपीचे शोध कार्य सुरू असतांना दरम्यान आरोपीचे वकीलांने जिल्हा व सत्र न्यायालय भोकर येथे दि. २२ ऑगष्टला अटकपुर्व जामीन मिळण्याचा अर्ज केला होता परंतु न्यायालयाने दि. ३० ऑगष्ट ला अटकपुर्व जामीन नामंजुर केला.

पुढे छ.संभाजीनगर येथे उच्च न्यायालयात दि. ६ सप्टेंबरला अटक पुर्व जामीन मिळण्या करता अर्ज केला होता, यावेळी न्यायाल्याने तात्पुरत्या कालावधी करता अटी शर्तीच्या अधीन दि. २० सप्टेंबरला अटकपुर्व जामीनाची नोटीस देवुन पोलिसांना तपासात सहकार्य करण्याचे नमुद केले होते, त्याचवेळी दि. १ ऑक्टोबरला या प्रकरणातील कागदपत्रे मागविली होती, दि. १६ ऑक्टोबर रोजी मा. उच्च न्यायालयाने सर्व कागदपत्रांवर विचार करून म्हटले आहे, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायद्यातील या कठोर तरतुदींबाबत, अटकपूर्व जामीन मंजूर करण्याची ही स्थिती नाही. अर्जदाराने केलेल्या गर्भधारणेच्या इतर समाप्तीबाबत खात्री करण्यासाठी अर्जदाराची कोठडीत चौकशी करण्याची मागणी करणे न्यायप्रविष्ट आहे,

स्त्री भ्रूणहत्येवर नियंत्रण ठेवण्याची गरज लक्षात घेऊन तपास यंत्रणेला प्रभावी तपास करण्याची संधी दिली पाहिजे. असे नमुद करत अर्जदाराचा अटकपुर्व जामीन नाकारत अर्ज बाद केला आहे. असे औरंगाबाद उच्च न्यायालयाचे मा.न्यायमूर्ती आर एम जोशी यांनी त्या बोगस डॉक्टराचा अटकपूर्व जामीन नाकारतांना म्हंटले आहे.

या प्रकरणात पोलिसांनी मवाळ भुमीका घेवुन एवढे दिवस आरोपीला मोकाट कसे सोडले अशी चर्चा संबंध जिल्हाभर सुरू असुन यातील आरोपीच्या घराचे खोदकाम, यामागील सुत्रधार, यातील कॉल रेर्कॉर्ड वरून मिळालेल्या महिलांची तपासणी, गर्भपाताची औषधे देणाऱ्या मेडीकल चालकाची तपासणी करून त्याचा नोंदणी क्रमांक परवाना रद्द करून गुन्हा दाखल करावा, या प्रकणात असलेल्यांना पोलीसी खाक्या दाखवुन काय ते जनतेसमोर आनावे, नाहीतरी पोलीसांनी यात मोठी माया घेतल्याची चर्चा तालुक्यातील जनता चविने करत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button