कंधार, सचिन मोरे | कंधार तालुक्यातील श्री क्षेत्र उमरज हे लाखो श्रद्धाळू भाविकांचे श्रध्दास्थान असून याठिकाणी श्रध्देने मागितलेले सर्व काही मिळते याचा साक्षात्कार मला माझ्या ४० वर्षाच्या राजकीय वाटचालीमध्ये झाला असून मी आज जे काही आहे ते संत नामदेव महाराज यांची कृपा होय. त्यांच्या सेवेत नतमस्तक होत उमरजच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी खेचून आणुन उमरज चा भरीव असा विकास केला जाईल अश्या प्रकारची ग्वाही मा.खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली .
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मिनी पंढरपूर ( उमरज) येथे 30 कोटी रुपयांच्या माळाकोळी – वागदरवाडी – चोंडी प्राजिमा -५९ ,दगडसांगवी – उमरज – रामा ५६ – ते प्राजिमा पर्यंत रस्त्याचे पाईप मोऱ्यांच्या कामासह सुधारणा करण्याच्या कामाचा शुभारंभ व व उमरज ता.कंधार येथील श्री.छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसराचा सुशोभीकरण, पर्यटन व सांस्कृतिक विभाग अंतर्गत नामदेव महाराज संस्थान परिसराचा विकास करणे या कामांचा लोकार्पण सोहळा धाकटे पंढरपूर चे मठाधीपती श्री संत महंत एकनाथ गुरु नामदेव महाराज व माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते पार पडला.
प्रारंभी श्री क्षेत्र उमरज मठ संस्थान व गावकऱ्यांच्या वतीने मा. खा. प्रताप पाटील चिखलीकर यांचा खारीक खोबऱ्याचा हार, शाल,श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला. सत्कारास उत्तर देताना चिखलीकर म्हणाले की माझ्या राजकीय जीवनामध्ये मी अनेक निवडणुका लढवल्या असून उमरज येथील संत नामदेव महाराज यांच्या कृपेने मी दोन वेळेस आमदार व एक वेळेस खासदार म्हणून जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मला आपल्यामुळेच मिळाली होती हे मी कदापी विसरू शकत नाही .माझ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये उमरज नगरीतील जनतेने मला भरघोस मतदान देऊन माझी नेहमीच पाठराखन केली आहे .मी उमरज वाशियांचे उपकार या जन्मात फेडू शकणार नाही असे भावनिक उद्गार चिखलीकर यांनी उमरज येथे व्यक्त केले.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारणी सदस्य बाबुराव केंद्रे, भाजपा चे विधानसभा प्रमुख तथा जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर, जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील तेलंग, तालुकाध्यक्ष किशनराव डफडे, जिल्हा उपाध्यक्ष भगवानराव राठोड, कंधार नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ.अनुसयाताई केंद्रे, कंधार नगरपालिकेतील माजी उपनगराध्यक्ष जफरोद्दीन बाहोद्दीन, सचिन पाटील चिखलीकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुमित पाटील, माजी नगरसेवक व्यंकट मामडे, प्रल्हादराव पाटील फाजगे, उमरज ग्रामपंचायत सरपंच जयश्री केंद्रे, मधुकरराव डांगे, आसिफ शेख, बाळासाहेब गर्जे, प्रदीप फाजगे, बाबाराव भुत्ते ,विनोद तोरणे, नवनाथ तोरणे, राजेश भुत्ते माधव भुत्ते ,शिवाजी गुट्टे ,बालाजी तोरणे, माधव डोंगरगावकर, बालाजीराव पवळे, शासकीय कंत्राटदार सूर्यकांत गुट्टे यांच्यासह परीसरातील हजारो भाविक ,कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती . या कार्यक्रमाचे प्रास्तविक विनोद तोरणे यांनी केले तर सुञसंचलन श्रीराम फाजगे यांनी केले.