नांदेड| सद्गुरु श्री श्री मल्लिनाथ महाराजांची उपस्थिती गुंडेगाव येथील श्री भोळेश्वर लिंग मल्लिनाथ देवस्थानचा वार्षिक उत्सव शनिवारी दिनांक ५ ऑक्टोबर रोजी आयोजित केला आहे.


या देवस्थानास, आश्रम शासनाने ब वर्ग तीर्थक्षेत्राचा व पर्यटनाचा दर्जा दिला आहे . निसर्गरम्य डोंगरावरती वसलेल्या श्री भोळेश्वर लिंग मल्लिनाथ देवस्थानचा वार्षिक उत्सव दर वर्षी प्रमाणे विविध कार्यक्रमाने व उपक्रमाने साजरा होणार आहे.


यावर्षी मतदान जनजागृती अभियान, व्यसनमुक्ती अभियान, गौरव राष्ट्र भक्तांचा, आरोग्य शिबिर, कायदे विषयक शिबिर, पर्यावरण शिबिर, व देशभक्ती गायनाचा, भजनाचा कार्यक्रम होणार आहे,तसेच तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन परमपूज्य सद्गुरु श्री श्री हवा मल्लिनाथ महाराज यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विविध अधिकारी उपस्थित राहणार आहेत.


तरी सर्व भाविक भक्तांनी परमपूज्य सद्गुरु श्री श्री हवा मल्लिनाथ महाराज यांच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, अशी विनंती दासराव हंबर्डे देवस्थानचे विश्वस्त तथा राष्ट्रीय सचिव जय भारत माता सेवा समिती नवी दिल्ली. व समस्त गावकरी मंडळी गुंडेगाव, असदवन, बाभूळगाव, पांगरी, वाघाळा, झरी, यांनी केली आहे.



