नांदेड| श्री गणेश विसर्जना निमित्त नांदेड शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्यावतीने काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत गणेश मंडळ अध्यक्षांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, मनपा कर्मचारी , अधिकार्यांचा नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार मोहनराव हंबर्डे यांच्यावतीने वजिराबाद येथे भव्य सत्कार सोहळा पार पडला.
महावीर चौक हनुमान मंदिर वजीराबाद येथे आयोजित या सत्कार सोहळ्यात सुमारे 30 ते 40 सार्वजनिक गणेश मंडळांच्या अध्यक्षांचा आमदार मोहनराव हंबर्डे यांनी यथोचित सन्मान केला. मिरवणुकीत उत्कृष्ट देखावे साकारणाऱ्या कलावंतचा यावेळी गौरव करण्यात आला. मिरवणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बंदोबस्त लावणाऱ्या उपस्थित वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी सूत्रसंचालन मुरलीधर हंबर्डे यांनी केले.
तर व्यासपीठावर डी.पी.सावंत. आनंद गुंडेले. मनोहर पाटील शिंदे. आनंद चव्हाण.केदार सोळंके.सुरेश हटकर.रमेश गोडबोले .बालाजी चव्हाण. रविन्द्र बुंगई. गगन यादव. भारत भूषण यादव . मोहन सिंग गाडीवाले.राजू मोरे.अतुल पेदेवाड .तुषार पोहरे.अजितपाल गिरणेवाले. राबिनसिंग गिरनीवाले. प्रथमेश पावडे. संतोष देशमुख . धनंजय उमरिकर.शंकर पाटील.राजू डोळेवार. यांच्या सह काँग्रेसचे पदाधिकारी, गणेश भक्त व गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार हंबर्डे यांची शिष्टाई
दुपारी तीन वाजता सुरू झालेला हा सत्कार सोहळा रात्री दहा वाजेपर्यंत अखंडित सुरूच होता. दरम्यानच्या काळात उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिरवणुका पुढे नेण्यासाठी गणेश मंडळांना आग्रह धरला. यावेळी मंडळाचे पदाधिकारी व पोलीस यांच्यात काही काळ शाब्दिक चकमक उडाली. हा गोंधळ पाहून स्टेजच्या खाली उतरून आमदार मोहनराव हंबर्डे यांनी मध्यस्थी करून पोलिसांची समजूत काढली. प्रसंगावधान राखून आमदार हंबर्डे यांनी केलेल्या शिष्टाईमुळे गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे समाधान झाले.यावेळी त्यांनी आमदार मोहनराव हंबर्डे यांचे आभार व्यक्त केले. त्यानंतर मिरवणुकांना पुन्हा शांततेत प्रारंभ झाला.