forest range officer Rohit Jadhav ; वन्यप्राणी रानडुक्कर यानी हल्ला केलेल्या ईसमास वनपरीक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांच्या हस्ते ५ लाखांचा धनादेश वनपरीक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांची उत्कृष्ट कामगीरी – NNL

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूरतालूक्यातील बंजारा तांडा येथील राजू मोहन पवार यांच्या वर रानडुक्करांनी हल्ला करून मोठ्या प्रमाणात जख्मी केले होते,राजू याने यवतमाळ येथे शाशकिय रूग्णालयात उपचार केले ,व उपचार दरम्यान मेडिकल व आलेला खर्च वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालय कडे सादर केला होता. वनपरीक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांच्या हस्ते दि.१७ सष्टेबर रोजी धनादेश देण्यात आला,

बंजारा तांडा शिवारात दि.२३.७.२०२३ रोजी शेतकरी राजु मोहण पवार व त्यांच्या पत्नी शेतात काम करत असताना अचानक दुपारी १२ वाजताच्या सुमारास रानडुक्कराने राजू वर हल्ला केला राजु व त्यांच्या पत्नीने आरडाओरडा केल्याने शेजारील शेतकरी धावत आले व रानडुक्करांने पोबारा केला या हल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याने त्यांस माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आनले असता डॉ. अवधूत गोदमले. डॉ. मुंगळकर. यांनी प्रथमोपचार केले व पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले होते.

सदर प्रकरणाची चौकशी वनपरीक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांच्या मार्गदर्शनात अभिजित देशमुख वनपाल मांडवा, माधव डाके वनरक्षक,यांनी करून उपवनसंरक्षक नांदेड केशव वाबळे व सहाय्यक वनसंरक्षक गणेश गिरी यांचे मार्गदर्शनात वरिष्ठ कार्यालयात पाठपुरावा केला व त्यांना रुपये ५ लाख मंजूर करण्यात आले यावेळी राजू पवार व त्याच्या पत्नी दोन मुली यांनी वनपरीक्षेत्र रोहित जाधव यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले.

वन्यजीव नुकसानभपाई , पशुधन हानी व मनुष्य हानी संबंधी नुकसानभपाईची सर्व प्रक्रिया ही mahaforest या संकेस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सुरू असून ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असल्यास संबंधित संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा . राजू मोहन पवार यांच्या प्रमाणे वन विभाग मदत मिळूउन देण्यास कटिबध्द आहे .
रोहित जाधव ( वनपरिक्षेत्र अधिकारी,माहूर )

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button