नांदेड| शहरातील गोविंद नगर येथील रहिवासी माजी सैनिक अशोक तुकाराम सोनाळे यांचे आज दुपारी दुःखद निधन झाले आहे.
अशोक सोनाळे हे भारतीय सैन्यात होते. आज दुपारच्या सुमारास त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.
भारतीय सैन्यात त्यांनी २२ वर्ष कर्तव्य बजावले आहे. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी त्यांचे राहते घर गोविंद नगर उज्वल इंटरप्राईजेसच्या बाजूला येथून निघणार असून त्यांच्यावर उद्या दिनांक 11 रोजी सकाळी 10:00 वाजता गोवर्धन घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.