हिमायतनगर,अनिल मादसवार| तालुक्यात तिन्ही मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असुन, शेतकऱ्यांच्या पिकांचे १००% नुकसान झाले आहे. तसेच घरांची पडझड झाली असून, आज १० दिवस उलटूनही शासनाची कुठलीही मदत जाहीर झालेली नाही. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांना घेऊन काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉ. रेखाताई चव्हाण या हिमायतनगर तहसील कार्यालयावर धडकल्या. या याठिकाणी शेतकऱ्यांना तात्काळ मदत देऊन या संकटातून बाहेर काढण्यासाठी हेक्टरी ५० हजार रुपये आणि घरपडीला २५ हजाराचे अनुदान देण्याची मागणी केली आहे.



हदगाव – हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टीने शेतकरी हतबल झाला आहे. या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा नांदेड जिल्ह्याच्या प्रभारी अध्यक्षा डॉ.रेखाताई चव्हाण गोर्लेगावकर यांनी पुढाकार घेतला. यासाठी क्षणाचाही विलंब न करता गेल्या तीन दिवसापासून मतदार संघातील पैनगंगा नदीकाठावरील नुकसानग्रस्त भागात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केले. त्यांनी हिमायतनगर तालुक्यातील नदीकाठच्या आणि इतर अश्या जवळपास 30 गावांमध्ये भेटी देऊन नुकसानग्रस्त पिकाची पाहणी केली.



आणि आज दिनांक ०९ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयावर शेकडो शेतकऱ्यांना घेऊन धडकल्या. यावेळी तहसीलदार पल्लवी टेमकर याना अतिवृष्टीच्या पुराच्या पाण्याने पिकांचा चिखल झाल्याचे वास्तव चित्र आणि पुरामुळे गाळ साचून जमिनीचा पोत कसा खराब झाला. हि परिस्थिती अवगत करून दिली, तसेच नदीकाठच्या शेतकऱ्यांना विशेष पैकेज आणि अन्य सर्व शेतकऱ्यांना सरसकर हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान देण्याची मागणी केली. तसेच घरपडीला कमीत कमी २५ हजार रुपये द्यावे. मागील वर्षीचा रखडलेला पिकविमा तात्काळ देण्यात यावा. शेतकऱ्यांच्या शेतीसाठी लागणारे सर्व अवजार GST मुक्त करण्यात यावे, पिकाला MSP (हमी भाव) मिळावा, फक्त शेतकऱ्याने जगाला पोसण्याचा ठेका घेतला नाही. शासन म्हणून आपली जवाबदारी स्पष्ट करावी, आनेवारी जाहीर करून सरसकट तर मदत द्यावी आणि नदीकाठच्या गावाला विशेष अनुदान द्यावे अश्या मागणीचे निवेदन तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्यामार्फत शासनाला पाठविले आहे.



सर्वे करताना मागील काळात तलाठी मंडळ अधिकाऱ्यानी खिसा गरम करणारांना जास्त अनुदान मिळून देण्याचा प्रकार केला. त्यामुळे खरे नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहिले आहेत. एव्हढेच नाहीतर बाजूच्या मंडळात जास्त मदत आणि त्याला लागून असलेल्या इतर मंडळातील शेतकऱ्यांना कमी मदत असा प्रकार झाला आहे. यावर बारकाईनं लक्ष ठेऊन यंदाच्या मदतीच्या बाबतीत असा गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली. अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल आणि होणाऱ्या आंदोलनास प्रशासनाला तोंड द्यावे लागेल असा इशारा देखील महिला कॉग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा नांदेड जिल्हा महिला प्रभारी अध्यक्षा डॉ. रेखाताई चव्हाण त्यांनी यावेळी दिला. याप्रसंगी त्यांच्यासोबत पैनगंगा नदीकाठावरील पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली, कोठा, बोरगडी, तांडा 1, तांडा 2, धानोरा, वारंगटाकळी, मंगरूळ, खैरगाव ज, वडगाव ज, सिबदरा, कारला यासह अनेक गावात शेतकऱ्यांची उपस्थिती होती.



