100% loss of farmers’ crops due to heavy rainfall : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे १००% नुकसान; हेक्टरी ५० हजार आणि घरपडीला २५ हजाराचे अनुदान देण्याची मागणी -NNL
हिमायतनगर,अनिल मादसवार| तालुक्यात तिन्ही मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असुन, शेतकऱ्यांच्या पिकांचे १००% नुकसान झाले आहे. तसेच घरांची पडझड झाली असून, आज १० दिवस उलटूनही शासनाची कुठलीही मदत जाहीर झालेली नाही. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांना घेऊन काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉ. रेखाताई चव्हाण या हिमायतनगर तहसील कार्यालयावर धडकल्या. या याठिकाणी शेतकऱ्यांना तात्काळ मदत देऊन या संकटातून बाहेर काढण्यासाठी हेक्टरी ५० हजार रुपये आणि घरपडीला २५ हजाराचे अनुदान देण्याची मागणी केली आहे.
हदगाव - हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टीने शेतकरी हतबल झाला आहे. या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा नांदेड जिल्ह्याच्या प्रभारी अध्यक्षा डॉ.रेखाताई चव्हाण गोर्लेगावकर यांनी पुढाकार घेतला. यासाठी क्षणाचाही विलंब न करता गेल्या तीन दिवसापासून...
