नांदेड| पूर्णा येथील विद्या प्रसारिणी सभेचे हायस्कूलचे मराठी विषयाचे सहशिक्षक श्री पाराशर शंकरराव स्वामी यांना अविष्कार फाउंडेशन ऑफ इंडिया (NGO) कोल्हापूर यांच्यातर्फे यावर्षीचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
स्वामी सर हे गेल्या 19 वर्षापासून या शाळेत अध्यापनाचे कार्य करतात.एक उपक्रमशील शिक्षक, विद्यार्थी प्रिय शिक्षक , उत्कृष्ट वक्ते सूत्रसंचालक, कथाकार, नाट्यदिग्दर्शक, विद्यालय गीताचे रचनाकार, वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा अशा अनेक स्पर्धेतून विद्यार्थ्यांना घडवणारे, ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा ‘ या स्पर्धे शाळेला यश मिळवून देण्यात महत्वपूर्ण योगदान देणारे, शैक्षणिक क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रातही सरांचा कार्य आहे. रक्तदान शिबिर, वधु-वर परिचय मेळावा, सामूहिक विवाह मेळावा, वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती घडवून आणण्यात महत्त्वपूर्ण सहकार्य करणारे, अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वामी सर. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना या वर्षीच्या राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे आहे.दि.29/09/2024 रोजी सोलापूर येथील एका भव्य कार्यक्रमात तो प्रदान करण्यात येणार आहे.
त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रयजी वाघमारे साहेब उपाध्यक्ष श्री भिमरावजी पाटील कदम आॅ. सेक्रेटरी श्रीनिवासजी काबरा अॅक्टिंग सेक्रेटरी श्री वि .गो.रुद्रवार सर कोषाध्यक्ष श्री उत्तमरावजी कदम, श्री साहेबरावजी कदम ,श्री बाबुरावजी मोरे,सौ विद्याताई पवार ,श्री ज्ञानदेव रणमाळ डॉ.सोनी साहेब डॉ. विनय वाघमारे साहेब श्री इंजि. काकडे साहेब डॉ. हरिभाऊ पाटील सर सर्व संचालक मंडळ मुख्याध्यापक श्री डी.एल.उमाटे सर,प्राथमिक मुख्याध्यापक श्री हिंगणे सर,जवाहरलाल नेहरू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बेगम व संस्थेचे सर्व शिक्षक वृंद ,कर्मचारी यांनी पुरस्काराबद्दल स्वामी सरांचे अभिनंदन केले आहे.