नांदेड| नांदेड शहरातील श्रावस्ती नगर, तेहरा नगर, पंचशील नगर, जुना नांदेड परिसरात मागील 4 ते 5 दिवसात सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नागरी वस्त्यांमधे पाणी साचून तलावाचे स्वरूप आले होते. त्यात अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. त्यांना विना पंचनामे तात्काळ सरसकट आर्थिक मदत द्या अन्यथा रिपब्लिकन सेना तीव्र आंदोलन करेल अशा आशयाचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री याना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले.
निवेदनावर रिपब्लिकन सेनेचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य मोहनदादा लांडगे, नांदेड जिल्हाध्यक्ष संदीपभाऊ मांजरमकर, जिल्हा महासचिव शंकर थोरात, जिल्हा सचिव रविंद्र सोनकांबळे, इंजि. नरेश शास्त्री, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष अंकुश सावते, बंटी कंधारे, संतोष आगबोटे, भीमराव बुक्तरे, रोहन दादा नरवाडे, दिगंबर वाघसर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.