HomeनांदेडInspection of damaged area : नुकसानग्रस्त भागाची विभागीय आयुक्तांकडून पाहणी -NNL

Inspection of damaged area : नुकसानग्रस्त भागाची विभागीय आयुक्तांकडून पाहणी -NNL

नांदेड| अर्धापूर तालुक्यात 1 ते 3 सप्टेंबर 2024 रोजी अतिवृष्टी झाली आहे. तालुक्यातील बराच भाग अतिवृष्टीने बाधीत झाला आहे. महसुल विभागाकडून अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नुकतीच नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. पाहणी करताना त्यांच्यासोबत अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार अर्धापूर, नायब तहसिल महसुल-1, मंडळ अधिकारी, तलाठी हे उपस्थित होते.

अर्धापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. विशेषत: दांडेगाव नदी प्रवाहामुळे व आसना नदीच्या बॅक वॉटरमुळे नदी किनाऱ्यावरील गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. नदी लगतचे क्षेत्र 2-3 दिवस पाण्याखाली होते. या क्षेत्रातील पिकांचे व जनावरांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. पेरणीलायक असलेल्या 26 हजार 440 हे. आर क्षेत्रापैकी प्राथमिक अहवालानुसार 22 हजार 650 हे. आर. क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, याबाबतचा अहवाल शासनास कळविला आहे.

गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी या कार्यालयाचे कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांच्यामार्फत पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. तरी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, बँक पासबुकची प्रत व मोबाईल क्रमांक सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्याकडे द्यावेत, असे आवाहन तहसिलदार अर्धापूर यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments