नांदेड| नांदेड शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बंदाघाट परिसरात प्रेमप्रकरणातून एका महिलेचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना शनिवारी घडली आहे. या कृत्यानंतर आरोपीने स्वतःच्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. सदर युवक हा नायगाव तालुक्यातील लालवंडी येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड शहरातील वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बंदाघाट येथील एका महिलेचे शेजारी राहणाऱ्या एका युवकासोबात प्रेमसंबंध जुळाले होते. या प्रकरणाचा काही काळ सुखाचा गेला, त्यानंतर त्यांच्यात वाद होउ लागला. दरम्यान दि.३१ ऑगस्ट रोजी सकाळी या दोघांमध्ये अज्ञात कारणावरून भांडण झाले. रागाच्या भरात युवक संतोष बाने याने सदर महिलेवर चाकूने पोटावर सपासप वार केले. यामध्ये ती महिला गंभीर जखमी झाली तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


घटनेनंतर आरोपी युवक पळून गेला व मूळगाव लालवंडी ता. नायगाव येथे त्याच्या शेतामध्ये झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. सदर युवकाचे नाव संतोष आलेवाड (वय २५) असल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच्च वजीराबाद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक वाटाणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी लालवंडी ता. नायगाव येथील घटनास्थळी भेट दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सदर युवकाचे शव उत्तरीय तपासणीसाठी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले असून, या प्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वाटाणे हे करीत आहेत. युवकाचे त्या विवाहितेसोवत गेले अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.




