नांदेड | बिलोली व देगलूर तालुक्यातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी 30 ऑगस्ट रोजी बिलोली तसेचदेगलूर येथे आयोजित आढावा बैठका (जनता दरबार) काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्या असून 30 व 31 ऑगस्ट रोजीचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाने दिली आहे.
बिलोली-देगलूर तालुक्यातील विकास कामाबाबतचा आढावा घेण्यासाठी खा.डॉ.अजित गोपछडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि. 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता बिलोली आणि देगलूर येथे दुपारी 3 वाजता विकास कार्य आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु काही कारणास्तव यादोन्ही बैठका तुर्त पुढे ढकलण्यात आल्या आहेत.बिलोली व देगलूर तालुक्यातील भाजपा-महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.