नांदेडलेख

Baswantrao Mundkar : स्वर्गीय बसवंतराव मुंडकर यांच्या अविस्मरणीय गोष्टी- इनामदार -NNL

स्वर्गीय बसवंतराव मुंडकर यांच्या विषयीच्या अनेक गोष्टी आहेत. त्या विसरण्यासारख्या नाहीतच. जपून ठेवलेले आहेत.अविस्मरणीय आहेत. त्यातील दोन- तीन गोष्टी मी तुम्हाला सांगतो. 1952 – 53 ची गोष्ट मी त्यावेळी इयत्ता चौथीला होतो. खेडेगावातील शाळा संपवून मी बिलोलीच्या शाळेत दाखल झालो. खेडेगावात एकच शिक्षक सर्व शाळा सांभाळत असे मात्र बिलोली च्या शाळेत तासा तासाला शिक्षक होते.

धैर्याचे बिजारोपण – कै. बसवंतराव
इयत्ता चौथीत असताना भाषण स्पर्धा ठेवण्यात आली होती. याबाबत शाळेची नोटीस आली यात विद्यार्थी विद्यार्थिनींनी भाग घ्यावा. मी पहिल्यांदा आणि उत्स्फूर्तपणे सहभाग घेण्यासाठी नाव नोंदणी केलो. दर शनिवारी आमचे मुख्याध्यापक भाषण स्पर्धा ठेवत .त्यात विषयाच्या अनुकूल आणि प्रतिकूल बाजू मांडायची असे. शनिवार आला ठरल्याप्रमाणे म्हाळप्पाच्या घरा पाठीमागील जागेत सर्व विद्यार्थी एकत्र झालो. संपूर्ण शाळेवर स्वर्गीय बसवंतराव मुंडकर यांचे प्रभावी नियंत्रण होते. ते उभे टाकले की कुणीही चुळबूळ करत नसत.ते पाठीमागे उभे टाकले पाहिलं नाव माझं आलं विषय होता “खेडेगाव चांगलं की शहर” हा साधा विषय होता. काय बोलावं माहीत नाही, कसं बोलावं माहित नाही.

मी लहान सर्व मोठे पोर इयत्ता सातवीचे. काही मुलं त्या काळात धोतर घालून शाळेत येत असत. स्वर्गीय बसवंतराव मुंडकर हे सुद्धा शाळेत धोतर आणि हाफ शर्ट( दंडापर्यंत बाह्य असलेला) घालून शाळेत येत .धिप्पाड शरीर, केस न विंचरलेले असायचे. मी खेडेगावातून आलेला विद्यार्थी ते मला म्हणाले अरे तू उठ उठ बोल बोल बसवंतराव यांनी धैर्य दिल्यामुळे मी छाती काढून उभा राहिलो. मोठ धैर्य एकवटून बोललो. विद्यार्थ्यांनो मी छोटासा विद्यार्थी आहे असे म्हणून पुन्हा पटकन खाली बसलो. सर्व विद्यार्थी हसू लागले परंतु आजही मी सांगतो कोणत्याही सभेत बोलताना आजही मला कसलीही भीती वाटत नाही.याचा बिजारोपण जे झालेले आहे या धैर्याचे जे बीजारोपण झालेले आहे ते स्वर्गीय बसवंतरावजी मुंडकर यांचं होतं. धैर्याला कारणीभूत ठरले हे मला आवर्जून सांगितलं पाहिजे ही माझ्या शालेय जीवनातील आठवण मला अजूनही ताजी आहे.

असाच पुन्हा विषय शाळेत ठेवण्यात आला “नोकरी श्रेष्ठ की व्यवसाय श्रेष्ठ” मला कसं बोलायचं माहित झालं होतं. विषयाची माहिती होती बऱ्याच विद्यार्थ्यांनी नोकरी श्रेष्ठ यावर सविस्तर आणि चांगली मांडणी केली मलाही बोलण्याची कला अवगत झाली होती. मी नोकरी श्रेष्ठ म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांचे मुद्दे टिपून घेतले .प्रत्येक मुद्द्याचे प्रभावी खंडन केलय व्यवसाय श्रेष्ठ असल्याच्या विविध बाबी सविस्तरपणे सांगितल्या. यावेळी मला भाषण स्पर्धेत पहिलं बक्षीस मिळालं याला कारणीभूत म्हणजे स्व. बसवंतराव मुंडकर .हे त्यांचा विद्यार्थ्यावर धाक होता आणि चांगल्या कामाला प्रोत्साहन देण्याची त्यांची वृत्ती होती.

गोवा मुक्ती संग्राम
दुसरी गोष्ट अशी की गोवा भारतात नव्हता. पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. त्यावेळी पोर्तुगीज यांच्या अत्याचारामुळे गोवा मुक्ती संग्रामाची लहर सर्व भारतात पसरली होती. विद्यार्थ्यांनीही त्यात भाग घ्यायचा असे ठरले. मग काय करायचं संप करायचा, शाळा बंद करायची ,दुकान बंद करायचे हा विषय पुढे आला. बसवंतराव मुंडकर यांनी पुढाकार घेऊन म्हणाले चला आपणास आता शाळा बंद करायची, दुकान बंद करायचे बसवंतराव मुंडकर यांनी शाळेची घंटी वाजवली आम्हाला गोवा मुक्ती चळवळीची फारशी माहिती नव्हती सर्व विद्यार्थ्यांना रांगेत उभे केले आणि विद्यार्थी मोर्चा निघाला. गोवा मुक्ती झालाच पाहिजे, भारत माता की जय अशा घोषणा देत आम्ही निघालो. तेव्हा बिलोली फार छोटे शहर होतं.

IMG 20240825 160853 Baswantrao Mundkar : स्वर्गीय बसवंतराव मुंडकर यांच्या अविस्मरणीय गोष्टी- इनामदार -NNL

बसवंतराव मुंडकर यांनी दुकान बंद केली केवळ सात-आठ दुकान होती.गावात आम्ही सुद्धा दुकाने बंद करण्यासाठी ओरडत चळवळ करत गोवा मुक्ती संग्रामाच्या मोर्चात आम्ही पहिल्या रांगेत होतो.मला आजही आठवते गोवा मुक्ती संग्रामाच्या बिलोलीतील मोर्चाचे मुख्य होते बसवंतराव मुंडकर .बसंतराव मुंडकर यांच्या शालेय जीवनातील सवंगडण्याची नावे आजही मला आठवतात.बसवंतराव मुंडकर हे निफाड उंच रुंद छातीचा लेकरांचा बाप असल्यागत होते. त्यांच्या सोबतीला विठ्ठल पाटील होते. त्यांना पोलीस पाटील म्हणत विठ्ठल पाटील देखील धोतर नेसून शाळेत येत असत. विठ्ठल पोलीस पाटील यांचं फुल शर्ट असायचं.बसवंतराव मुंडकर यांचा हाफ शर्ट असायचं. त्याचबरोबर डॉक्टर सुरेश बिलोलीकर जे अमेरिकेत आहेत ते अमेरिकेत स्थायिक झालेले आहेत. एडवोकेट गोपाळराव बिलोलीकर, एडवोकेट चंद्रकांतराव बिलोलीकर ,तीम्माराव वकिलांचे भाऊ हे त्यांचे मित्र होते. सर्व मोठे हे सर्व पोर होते चांगली व भक्कम दिसायची बसवंतराव मुंडकर उंच दिपाड असल्यामुळे या सर्वात मोठे दिसायचे मुलांचे बाप असल्यासारखे.

किंग नव्हे किंगमेकर आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ
मी इयत्ता सातवीला असताना संयुक्त महाराष्ट्राची चळवळ निघाली.संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी दरम्यान बसवंतराव मुंडकर शाळेत नव्हते. त्यांनी इयत्ता सातवी पर्यंतची शाळा तेव्हाच पूर्ण झालेली होती. बसवंतराव मुंडकर यांना देशाच्या आणि राज्याच्या हिताच्या विविध चळवळीत भाग घेण्याची सवय होती. नेतृत्व करायची सवय होती अशा चळवळीत पुढाकार घेऊन ते काम पार पाडत असत.असेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आमच्याकडे आले म्हणाले की मोर्चा काढायचा आहे एकाने घंटे वाजवली मुलं बाहेर पडली दुकाने बंद केली घोषणा देणं सुरू झालं हा मोर्चा गावभर फिरून बागेतल्या मारुती जवळ या मोर्चाचा समारोप झाला तेथे भाषण झाली.अशा प्रकारे बसवंतराव मुंडकर हे चळवळीचे नेतृत्व होते बसवंतराव मुंडकर यांची आठवण काढताना मला आजही वाटते ही व्यक्ती कधी किंग झाली नाही मात्र किंगमेकर होती.आपल्या हाताखालील व सहवासातील जितके लोक आले त्या लोकांना पुढे केले.

लेखक….शामराव इनामदार, नांदेड.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!