HomeकरियरAjinkya Jadhav to America for higher education : अजिंक्य जाधव उच्च शिक्षणासाठी...

Ajinkya Jadhav to America for higher education : अजिंक्य जाधव उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला -NNL

नांदेड| अजिंक्य विठ्ठलराव जाधव अमेरिकेतील नाॅर्थइस्टर्न युनिव्हर्सिटी बोस्टन या जगप्रसिद्ध विद्यापीठात इंजिनिअरींग मॅनेजमेंट हा दोन वर्षाचा एमएस अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी दि.२२ ऑगस्ट रोजी अमेरिकेला जात आहे.

अजिंक्य लहानपणापासून हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जायचा. जेएसपीएम राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथून त्याने संगणकशास्त्र अभियांत्रिकी पदवी परीक्षेत चांगले मार्क्स मिळवले तसेच बाहेरील देशात अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी लागणारी परीक्षा जीआरई तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आणि नाॅर्थइस्टर्न विद्यापीठाने अजिंक्य चा प्रवेश पक्का केला.

अजिंक्य हा एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालय नांदेड येथिल प्रोफेसर विठ्ठलराव जाधव यांचा मुलगा आहे. या यशाबद्दल अजिंक्य चे जयप्रकाश दांडेगावकर, एमजीएम चे संस्थाध्यक्ष कमलकिशोर कदम, संचालिका डाॅ.गीता लाठकर, उपप्राचार्य डाॅ.शिरिष कोटगीरे,डाॅ.गोविंद हंबर्डे,प्रोफेसर जे.के.सावळे, प्रोफेसर पंडीत शिंपाळे आदींनी अभिनंदन केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments