हिमायतनगर,अनिल मादसवार। जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरात येणाऱ्या चौथ्या श्रावण सोमवारी श्री परमेश्वर मूर्तीला सुवर्ण अलंकाराणे सजविण्यात येणार आहे. त्यामुळे तमाम भाविक भक्तांना दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोज श्रीकृष्ण जन्माष्टमी दिनी सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत श्री परमेश्वर मूर्तीचं अलंकार स्वरूपात दर्शन घेता येणार आहे. अशी माहिती श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी दिली आहे.
हिमायतनगर (वाढोणा) नगरीतील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिर सव्वा सातशे वर्षाहुन अधिक जुने असुन, सामाजिक, धार्मिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. या मंदिराला इतिहासकालीन वैभव प्राप्त झाले असून, मागील काही वर्षपूर्वी शहराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. या मंदिराचा इतिहास अतिप्राचीण असुन, हेमाडपंथी उत्तराभीमुख मंदिरातील गाभा-यात शिवशंकर – विष्णुच्या अवातारातील हरीहर रुपातील श्री ची उभी मुर्ती आहे. अत्यंत देखणी व सर्वांग सुंदर अशी श्री परमेश्वराची मुर्ती काळ्या पाशानात घडवीलेली आहे. परम अधिक इश्वर म्हणजेच परमेश्वर हे देवाधीदेव आहेत. या मुर्तीचे वर्णन किंवा या मुर्तीशी अन्य देवतांच्या मुर्तीशी साम्य असणारे वर्णण आढळुन येत नाही. त्यामुळे हि मुर्ती भारतात एकमेव मुर्ती आहे, असे जुने जाणकार मानतात. भक्तांच्या नवसाला पावणारा देव म्हणुन विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश व ईतर भागात ख्यातीप्राप्त झाला असुन, या मंदिराशी तसेच जनतेशी भावनीक नाळ जुळालेली आहे. म्हणुन महाशीवरात्री, श्रावण महिन्यात श्रीच्या दशर्नासाठी लाखों भवीकांची दर्शनासाठी वाढोणा नगरीत मंदियाळी होते.
यंदा श्री परमेश्वर मंदिरात श्रावण मास उत्सवाला सोमवार दिनांक ०५ पासून सुरुवात झाली, यंदा ७१ वर्षानंतर सोमवार पासून श्रावण मासाला सुरुवात होऊन सोमवारीच श्रावण मासाचा समारोप होतो आहे. विशेषतः या महिन्यात पाच सोमवार येत असल्याने हरिहर रूपातील श्री परमेश्वर दर्शनाला महत्व प्राप्त झाले आहे. हा अद्भुत आणि दिव्या योग साधून होत श्रावण महिन्यात भाविकांच्या दर्शनाची, शुद्ध पेयजल नित्यनेमाने महाप्रसादाची सोय पदसिद्ध अध्यक्ष तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर प्रशासनाकडून करण्यात आली आहे. तसेच बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांच्या नेतृत्वाखाली ओम नमः शिवाय अखंड नामजाप सुरु आहे. २१ दिवस धार्मिक कार्यक्रम होत असून, शिवपुराण कथा, संत ज्ञानेश्वर माऊलींची गाथा तसेच भागवत कथेचे आयोजन दुपारी २ ते ५ या वेळेत करण्यात आले आहे.
या काळात भाविकांना श्री परमेश्वराचे महाशिवरातरी पर्वकाळाप्रमाणे अलंकारमय दर्शन घडावे या उद्देशाने संस्थानचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी सर्व संचालकांची तातडीची बैठक घेऊन येणाऱ्या चौथ्या सोमवारी सकाळी महाअभिषेक होऊन अळणकर सोहळा केला जणार आहे. त्यामुळे दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोज श्रीकृष्ण जन्माष्टमी दिनी तमाम भाविक भक्तांना सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत श्री परमेश्वर मूर्तीचं अलंकार स्वरूपात दर्शन घेता येणार आहे. अशी माहिती श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी दिली आहे. यावेळी सेक्रेटरी अनंतराव देवकते, संचालक प्रकाश कोमावार, प्रकाश शिंदे, राजाराम झरेवाड. वामनराव बनसोडे, लताताई पाध्ये, लताताई मुलंगे, मथुराबाई भोयर, एड.दिलीप राठोड, अनिल मादसवार, संजय माने, गजानन मुत्तलवाड, विलासराव वनखेडे, लिपिक बाबुराव भोयर गुरुजी सह अनेकांची उपस्थिती होती.