नांदेडआरोग्य

स्वातंत्र्य दिनानिमित्त साई नर्सिंग होम येथे आयोजित शिबिराला महिलांच्या प्रतिसाद -NNL

नवीन नांदेड। १५ आगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त साई नर्सिंग होम व अंकुर मॅक्स हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने गरोदर माता व १ ते १२ वयोगटातील मुला मुलीच्यी मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते,यावेळी महिला व मुला मुलीनी उस्फुर्त सहभाग नोदंवत आरोग्य तपासणी करून घेतली.

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त या शिबीराचे आयोजित करण्यात आले होते,यावेळी स्त्री रोग तज्ञ डॉ,निता रायेवार लॅप्रोस्कोपि सर्जन, डॉ.अजंली मद्रेवार कुंचेलिकर स्त्रीरोगतज्ञ वंध्यत्व निवारण उपचार व सल्ला मासिक पाळीतील आजार ,गर्भपिशवी संबंधित आजार व उपचार संबधी निदान बाबत, बालरोग तज्ञ डॉ. राजेश कुंचेलिकर यांनी शिबीरातील सहभागी रूग्ण यांच्यी तपासणी केली.

या शिबीरात रक्त तपासणी,१ ते १२ वयोगटातील मुला/मुलींचे तपासणी व सल्ला शिबिर आयोजन साई नर्सिंग होम क्रांती चौक,सिडको नांदेड करण्यात आले होते,यावेळी ५० महिला व २० मुलीमुले यांच्यी तपासणी करण्यात आली.

या शिबिराला नावामनपाचे सिडको क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड,माजी नगरसेविका प्रा.ललिता शिंदे, विजयाताई गोडघासे, डॉ.अशोक कलंत्री,डॉ.पाटील ,नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश ठाकूर,पत्रकार शशिकांत गाढे पाटील,गोविंद कोटीकवार,प्रसन्ना ऊतरवार, तुकाराम पातेवार,यांच्या सह मान्यवरांनी भेटी दिल्या, यावेळी मान्यवरांच्या डॉ.नरेश रायेवार व डॉ.सौ.निता रायेवार यांनी सत्कार केला. शिबिर यशस्वीते साठी वर्षा वाघमारे, वनिता डांगे व योगेश मुंगल यांनी सहकार्य केले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button