HomeनांदेडInsult of national flag in Shivani Forest Development Corporation : शिवणी वनविकास...

Insult of national flag in Shivani Forest Development Corporation : शिवणी वनविकास महामंडळाचे अधिकारी संतोष चोले यांच्याकडून राष्ट्रध्वजाचा अवमान -NNL

किनवट, परमेश्वर पेशवे| सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त देशभर होत असलेले हर घर तिरंगा अभियान मोठ्या उत्साहात साजरे होत आहे.या अभियानाला दिनांक १३ ऑगस्ट २०२४ ते १५ ऑगस्ट २०२४ असे तीन दिवस सर्व विभागाच्या कार्यालय प्रमुख यांनी आपल्या कार्यालयात ध्वजारोहण करावयाचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेने आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवायचा आहे. असे असतांना काही कार्यालय प्रमुखांकडून राष्ट्रध्वजाचा तसेच राष्ट्रीय ध्वजसंहितेचा अवमान झाल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे.

किनवट तालुक्यातील शिवणी येथील वनविकास महामंडळाचे वन परिक्षेत्र अधिकारी संतोष चोले हे नांदेडहून शिवणी येथे सकाळी दहा वाजता पोहोचले आणि तोपर्यंत तेथील कर्मचारी ध्वजारोहणाची तयारी करून ध्वज तसाच उघड्यावर जमिनीवर ठेवण्यात आलेला दिसून आला. त्यासाठी कुठल्याही प्लेट अथवा ट्रेचा वापर करण्यात आला नव्हता त्याच परिस्थितीत वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चोले यांनी दहा वाजता घाई गडबडीने ध्वजारोहण केला ध्वजा रोहन करण्याआधी तिरंगा ध्वजा व त्यास बांधलेली दोरी हीअस्त व्यस्त परिस्थितीत दिसून आल्याने शिवणी येथील एका उच्च शिक्षित तरुण इंद्रकरण पालेलू यांनी छायाचित्र काढले.

राष्ट्रध्वज अवमान प्रकरणी रीतसर लेखी तक्रार लिहून माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांच्यासह पोलीस प्रशासनास पत्र दिले. या पत्रात सदर वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाची कामकाजाची वेळ सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी सुरू होत असते.परंतु या शिवणी वनविकास महामंडळ कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी संतोष नारायण चोले. वनपरिक्षेत्र अधिकारी हे सकाळी १० वाजे नंतर कार्यालयात उपस्थित झाल्यामुळे तिरंगा ध्वज ध्वजारोहण नियमबाह्य वेळेत करण्यात आले असून त्यामुळे भारतीय ध्वज संहिता नियमावलीचे उल्लंघन झाले आहे. तसेच त्या पुढेही संतोष नारायण चोले याचे कनिष्ठ कर्मचारी यांनी तिरंगा ध्वज हाताळतांना कोणत्याही प्रकारची दक्षता घेतली नाही.अक्षरशः उभ्या असलेल्या खांब्याजवळ खालीच तिरंगा ध्वज ठेवून निष्काळजी पणाने राष्ट्रीय ध्वजाचा अवमान केला आहे. तरी या सदर संताप जनक व गुन्हेगारी घटनेची तात्काळ गंभीरतेने दखल घेऊन संतोष नारायण चोले. व त्यांचे कनिष्ठ कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.

तसेच सोबत सबळ पुराव्याकामी जिओ टॅगिंग फोटो जोडल्याचे म्हंटले आहे. या सोबतच या प्रकरणी संबधित विभागाच्या संकेतस्थळाद्वारे वरिष्टाकडे तक्रार पाठवली आले. संबंधितावर तात्काळ गुन्हा नोंद करून निलंबित करावे अन्यथा १५ आगस्ट रोजी किनवट उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा तक्रारदाराने दिला आहे. किनवट वनविकास प्रकल्पांर्गत येणाऱ्या शिवणी परीक्षेत्र कार्यालय वेळोवेळी काहि न काही कारणामुळे सदैव चर्चेत असते.आता राष्ट्रध्वजा अवमाना बद्दल पुन्हा एकदा चर्चेत आले असून.संबधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होईल या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments