Insult of national flag in Shivani Forest Development Corporation : शिवणी वनविकास महामंडळाचे अधिकारी संतोष चोले यांच्याकडून राष्ट्रध्वजाचा अवमान -NNL
किनवट, परमेश्वर पेशवे| सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त देशभर होत असलेले हर घर तिरंगा अभियान मोठ्या उत्साहात साजरे होत आहे.या अभियानाला दिनांक १३ ऑगस्ट २०२४ ते १५ ऑगस्ट २०२४ असे तीन दिवस सर्व विभागाच्या कार्यालय प्रमुख यांनी आपल्या कार्यालयात ध्वजारोहण करावयाचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेने आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवायचा आहे. असे असतांना काही कार्यालय प्रमुखांकडून राष्ट्रध्वजाचा तसेच राष्ट्रीय ध्वजसंहितेचा अवमान झाल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे.
किनवट तालुक्यातील शिवणी येथील वनविकास महामंडळाचे वन परिक्षेत्र अधिकारी संतोष चोले हे नांदेडहून शिवणी येथे सकाळी दहा वाजता पोहोचले आणि तोपर्यंत तेथील कर्मचारी ध्वजारोहणाची तयारी करून ध्वज तसाच उघड्यावर जमिनीवर ठेवण्यात आलेला दिसून आला. त्यासाठी कुठल्याही प्लेट अथवा ट्रेचा वापर करण्यात आला नव्हता त्याच परिस्थि...
