HomeBlogDr. Anna Bhau Sathe Jayanti ; वझरा शेख फरीद येथे कॉ.डॉ.अण्णा...

Dr. Anna Bhau Sathe Jayanti ; वझरा शेख फरीद येथे कॉ.डॉ.अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात संपन्न – NNL

नांदेड | अतिदुर्गम,डोंगराळ, आदिवासी आणि नक्षलप्रवण क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या वझरा ता. माहूर येथे दि.१० ऑगस्ट रोजी अण्णा भाऊ साठे यांची १०४ जयंती मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरी करण्यात आली. यावेळी कॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागेवर ध्वजा वदंन करण्यात आले.

गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि समाजातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच दिपक केंद्रे,माजी उप सरपंच कॉ.वसंत राठोड, कॉ.बाबू दोहिले, विठ्ठल टाकळीकर, कॉ. बाबू टाकळीकर, बाबू टेंबरे, जीवन दरोडे, मोहन दरोडे,वाल्मिक दोहिले,गजानन चव्हाण,गजानन दोहिले,सय्यद ईसा, बालाजी मुंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांची जयंती मागील २० वर्षांपासून वझरा येथे अखंड करण्यात येत असून त्यांच्या कार्याचा व चळवळीचा इतिहास गौरवपूर्ण दृष्टीने मांडण्यात येतो.

मार्क्सवादी तत्वज्ञानी,आंबेडकरवादी लढवय्ये आणि संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील नेतृत्व करणाऱ्या समूहाचे नेते म्हणून अण्णा भाऊ साठेंचा इतिहास आहे. अण्णा भाऊ साठेना जातीच्या जोखडातून मुक्त करून कामगार, कष्टकरी, शेतकरी आणि सामान्य पीडित लोकांचे दुःख आणि त्यांच्या वेदना सरकार पुढे आणून त्यांच्या प्रश्नांना वाचाफोडून लढा देणारे अण्णा भाऊ डोंगराळ भागातील या जयंती मंडळास माहिती आहेत.

त्यांचा कम्युनिस्ट वारसा आणि लढाऊ बाण्याचा इतिहास बदलू पाहणाऱ्या आधुनिक विचारवंताना थेट एक प्रकारे आव्हान देण्यापर्यंत मजल मारण्याची क्षमता वझरा येथील जयंती मंडळास आहे. कॉ.डॉ.अण्णा भाऊ यांना यावेळी विनम्र अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली.

कॉ.गंगाधर गायकवाड, नांदेड

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments