नांदेड l ३० नोव्हेंबर २०२५ गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजूर अबिचलनगर साहिब, नांदेड येथे आज ७० वा सामूहिक विवाह मेळावा पार पडला. दिनांकः ३०/११/२०२५ रोजी हा मेळावा आदरणीय सिंघ साहिब जत्थेदार संत बाबा कुलवंत सिंघ जी आणि सर्व पंजप्यारे साहिबान आणि गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या विवाह सोहळ्यात २९ जोडप्यांचा विवाह झाला.


यावेळी डॉ. विजय सतबीर सिंघ प्रशासक साहेबांनी अभिनंदन संदेशाद्वारे आपले विचार व्यक्त केले आणि नवविवाहित जोडप्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी, गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ७० व्या सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यासाठी दिवसरात्र काम केले. पंज प्यारे साहिबांच्या तर्फे आदरणीय सिंघ साहिब जत्थेदार संत बाबा कुलवंत सिंघ जी यांनी नवविवाहितांना शुभेच्छा दिल्या आणि ७१ वा सामूहिक विवाह मेळावा दि. ०२ आणि ०३ मे २०२६ रोजी आयोजित करण्याची घोषणा केली.


आदरणीय सिंघ साहिब जत्थेदार संत बाबा कुलवंत सिंघ जी आणि पंज प्यारे साहिबान, संत बाबा बलविंदर सिंघ जी, श्री आनंदराव पाटिल बोंडारकर आमदार नांदेड़ दक्षिण, श्री महाजन सर, स्वा.रा.ती.वि., गुरुद्वारा बोर्डाचे माजी सदस्य, समाजसेवी, अधिकारी, कर्मचारी आणि संपूर्ण संगत १५ ते २० हजारच्या संख्येत उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक स. हरजित सिंघ कडेवाले आणि सर्व सहाय्यक अधीक्षक स. रविंदर सिंघ कपूर, स. बलविंदर सिंघ फौजी, स. जयमल सिंघ ढिल्लो, प्रशासक साहेबांच्या पी.ए. बबिता कौर चाहेल, इंचार्ज मेळावा विभाग, इंचार्ज लंगर विभाग तथा सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.




