उस्माननगर l डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदु धर्माचा त्याग करून लाखो अनुयायांना नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दिक्षा दिली त्या घटनेला आज ६९ वर्षे पूर्ण झाली. या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून कलंबर बुद्रुक ता.लोहा येथील सम्राट अशोक बौद्ध विहार येथे धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.


सकाळी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते . यावेळी सकाळी दहा वाजता सम्राट अशोक बौद्ध विहार येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त तथागत भगवान गौतम बुद्ध , सम्राट अशोक , आणि भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


याप्रसंगी सरपंच प्रतिनिधी उमाकांत सोरगे , श्रीधर गोरे , सुनील आप्पा मुक्कनवार , डि.के.कांबळे , मोहन आप्पा गाजेवार ,शेख रहेमद , श्रीराम निळकंठे , सिध्दार्थ कांबळे , पिंटु सुपेकर , पत्रकार नामदेव तारू यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.सर्वप्रथम सामुहीक त्रीशरन , पंचशील बौध्द उपासक अनिल सोनसळे यांनी ग्रहण केले. यावेळी अक्षय सोनसळे , आकाश सोनसळे , निखिल सोनसळे , सखाराम सोनसळे , कैलास हानवंते , करण सोनसळे , साहेबराव कांबळे कापसीकर , चंद्रकांत चौकुटे , विष्णू वाघमारे यांनी परिश्रम घेतले.यावेळी नागरिक, उपासक उपासिका, बाल बालिका मोठ्या संख्येने हजर होते.




