Friday, June 26

Tag: 69th Dhammachakra Pravartan Day celebrated with enthusiasm at Kalambar B.

69th Dhammachakra Pravartan Day ; कलंबर बु.येथे ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

69th Dhammachakra Pravartan Day ; कलंबर बु.येथे ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

धार्मिक, नांदेड
उस्माननगर l डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदु धर्माचा त्याग करून लाखो अनुयायांना नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दिक्षा दिली त्या घटनेला आज ६९ वर्षे पूर्ण झाली. या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून कलंबर बुद्रुक ता.लोहा येथील सम्राट अशोक बौद्ध विहार येथे धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते . यावेळी सकाळी दहा वाजता सम्राट अशोक बौद्ध विहार येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त तथागत भगवान गौतम बुद्ध , सम्राट अशोक , आणि भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरपंच प्रतिनिधी उमाकांत सोरगे , श्रीधर गोरे , सुनील आप्पा मुक्कनवार , डि.के.कांबळे , मोहन आप्पा गाजेवार ,शेख रहेमद , श्रीराम निळकंठे , सिध्दार्थ कांबळे , पिंटु सुपेकर , पत्रकार नामदे...
error: Content is protected !!