Thursday, May 14

Adv. Dilip Thakur : ॲड.दिलीप ठाकूर यांच्यातर्फे अखंडितपणे सुरू असलेल्या कायापालट या उपक्रमाला ५२ महिने पूर्ण – NNL

नांदेड| अखंडितपणे सुरू असलेल्या कायापालट या उपक्रमाला ५२ महिने पूर्ण झाले असून आतापर्यंत २६०० पेक्षा जास्त भ्रमिष्टांची कटिंग दाढी केल्यानंतर स्वच्छ पाण्याने स्नान घालून नवीन कपडे, चहा फराळ व शंभर रुपयाची बक्षीसी देण्यात आली असून हिवाळ्याच्या पुढील तीन महिन्यात गरजूंना गरम पाण्याने स्नान व स्वेटर देण्यात येणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.

सातत्याने चालणारा कायापालट सारखा उपक्रम जगात कुठेच होत नाही.दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल,अमरनाथ यात्री संघ, सन्मित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे कायापालट उपक्रम राबविण्यात येतो.यासाठी खा.अशोकराव चव्हाण खा.डॉ. अजित गोपछडे,आ. प्रतापराव पाटील चिखलीकर,मराठवाडा प्रदेश संघटन मंत्री संजय कोडगे,भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे व ॲड. किशोर देशमुख, ला. योगेश जैस्वाल,ला. शिवाजीराव पाटील यांचे मार्गदर्शन मिळत असते. डिसेंबरच्या पहिल्या सोमवारी ५२ व्या महिन्यात ५६ भ्रमिष्ट, कचरा वेचणारे, अपंग, बेघर नागरिकांना अरुणकुमार काबरा,सुरेश शर्मा,संजयकुमार गायकवाड, शिवा लोट यांनी स्वतःच्या दुचाकी वर बसवून गोवर्धन घाट पुलाखाली आणले.

स्वयंसेवक राजूअण्णा पस्पुनुर व गजानन शास्त्री या दोघांनी सर्वांची काळजीपूर्वक कटिंग दाढी केली.भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांच्या सहकार्याने स्नान करण्याची व्यवस्था करण्यात आली. कित्येक दिवस आंघोळ न करणाऱ्या या नागरिकांना विलास जोगदंड यांने साबण लावून स्नान घातले.त्यानंतर नवीन अंडरपॅन्ट, बनियन व पॅन्ट शर्ट वाटप करण्यात आले.ही भ्रमिष्ट मंडळी कायापालट होण्यासाठी तयार व्हावे म्हणून शंभर रुपयाची बक्षिसी व चहा फराळाची व्यवस्था केली होती.पूर्वीचे मळके कपडे,अवास्तव वाढलेले केस आणि नंतरची चकाचक करण्यात आलेली कटिंग दाढी व नवीन कपडे घातल्यामुळे उपेक्षितांचा झालेला कायापालट पाहून सर्वजण हरखुन गेले.डॉ.अर्जुन मापारे व डॉ.दि.बा.जोशी यांनी आजारी असलेल्या व्यक्तींची तपासणी केली.

Picsart 24 12 02 09 46 13 585 Adv. Dilip Thakur : ॲड.दिलीप ठाकूर यांच्यातर्फे अखंडितपणे सुरू असलेल्या कायापालट या उपक्रमाला ५२ महिने पूर्ण - NNL

तसेच जखमांची मलमपट्टी करून मोफत औषधे दिली. हा उपक्रम पाहून प्रतिष्ठित व्यापारी सुनील साबू व ओमप्रकाश बंग यांनी दिलीप ठाकूर व त्यांच्या टीमचे तोंड भरून कौतुक केले. कायापालट उपक्रम संपल्यानंतर नांदेड एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारणी सदस्य ॲड. चिरंजीलाल दगडिया यांच्या मार्गदर्शनाखाली गोवर्धन घाट परिसराची स्वच्छता करण्यात आली. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी कायापालट हा उपक्रम राबविण्यात येत असल्यामुळे अशा बेघर व्यक्ती आढळल्यास जानेवारी महिन्याच्या पहिल्या रविवारी त्याची माहिती द्यावी असे आवाहन संयोजक दिलीप ठाकूर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!