लोहा। लोहा तालुक्यात ३६हजार ११६ अर्ज प्राप्त झाले त्यात ३४ हजार ९७७ अर्ज अपरोव्हल साठी पाठविण्यात आले असून ९१ अर्जात त्रुटी आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी सविस्तर बोलणे झाले. आमच्या महायुती सरकारने राबविलेली ही योजना बहिणीसाठी खुप आधार देणारी आहे. राखी पौणिमेला ओवाळणी मिळणार असून, बहिणींच्या खात्यात अनुदान जमा होईल असे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण समितीच्या लोहा विधानसभा अध्यक्षा प्रणिताताई देवरे -चिखलीकर यांनी सांगितले.
लोहा तहसील कार्यालयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या विधानसभा अध्यक्षा प्राणिताताई देवरे-चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.समितीचे सदस्य गंगाप्रसाद येन्नावार , सदस्य ऍड मारोती पंढरे, नायब तहसील अशोक मोकले, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी एस आडीराघो, बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती पवार, नगर पालिका कार्यालयीन अधीक्षक उल्हास राठोड, संजय गांधिं निराधार योजनेच्या विभाग प्रमुख वैशाली चाटे, सहायक बीडीओ संगीता वानखेडे, , माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, भाजपा तालुकाध्यक्ष आनंदराव शिंदे, माजी उपनगराध्यक्ष दता वाले, करीम शेख , यासह कर्मचारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री माझी लाकडी बहीण योजनेचे लोहा विधानसभा अध्यक्ष पदी प्राणिताताई देवरे चिखलीकर यांची निवड झाल्या नंतर पाहिली बैठक त्याच्या अध्यक्षतेखाली आज शनिवारी १४ ऑगस्ट रोजी पार पडली .या योजनेमुळे बहिणीना मदत होणार आहे.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,भाजपाचे नेते,राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे प्राणिताताई देवरे व सहकाऱ्यांनी योजना सुरू केल्या बद्दल अभिनंदन केले.
लोहा तालुक्यात “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेसाठीं एक ऑगस्ट पर्यंत ३६ हजार ११६ अर्ज दाखल झाले त्यात दोन अर्ज पेंडिंग आहेत अपरोव्हल साठी पात्र 34 हजार 977 अर्ज असुन रिव्ह्यू एक तर वेगवेगळ्या कारणाने ९१ अर्ज त्रुटीत निघाले आहेत .या योजनेची ऑन लाईन जोडणी थेट राज्याशी आहे.
त्यामुळे त्रुटी निघालेले अर्ज तालुक्याला कळणार नाहीत म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत याच्याशीप्राणिताताई बोलल्या त्यांनी अडचण मांडली. त्रुटीतील नावे माहिती व्हावीत जेणेकरून त्या त्या गावात जाणून त्या त्रुटी अर्जाची पूर्तता करता येईल व बहिणीला लाभ मिळेल. लाडकी बहीण.योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी गैरप्रकार होऊ नये .असा महत्वाच्या सूचना प्राणिताताई यांनी संबधित विभागास दिल्या. तसेच राखी पौर्णिमा काळात बहिणीच्या खात्यात पैसे पडणार आहेत असे त्यांनी सांगितले .बैठकीत अशासकीय सदस्य ऍड पंढरे, ऍड एन्नावार यांनी सूचना केल्या.