लोहा| राजकारणात कधी कोणाचे नशीब फळाला येईल सांगता येत नाही. नशीब अपना अपना’ असंच काहीच निवडणूकीत असते…. गेल्या निवडणुकीत ३ लक्ष ७२ हजार मतदान पडलेल्या उमेदवाराला या निवडनुकीत ‘नोटा’ पेक्षाही कमी मतदान पडले … !..अहो….! आपला विश्वास बसणार नाही.. छे;..! अस ..कस ..होईल बर..! हे तर शक्यच नाही असं छाती ठोकपणे आपण सांगणार- हो…! पण हे खरं आहे…!


त्याचे असे की, लातूर या एससी राखीव मतदार संघात दोन निवडकुरा हरल्यानंतर कांग्रेस पक्षाने या निवडनुकीत डॉ. शिवाजी काळगे या बालरोग तज्ज्ञ डॉक्टराच्या रुपाने विजय संपादन केला आहे. बदलते वारे ….. आरक्षण… संविधान बदलणार ..यासह विरोधातले वारे’ जोरात वाहिले .. अन’ अबकी बार…..भाजपा गार ..! असेच झाले.


मागील निवडणुकीत २०१९ मध्ये काँग्रेस पक्षाने मच्छिंद्र गुणवंत कामंत यांना ‘ लातूर मधून उमेद्वारी दिली. त्यांना ३ लक्ष ७२ हजार ३८४ मते मिळाली. त्यांच्या विरोधात भाजपा उमेदवार सुधाकर शृंगारे मोठ्या मताधिक्याने निवडून आले. यावेळी काँग्रेस पक्षाने उमेदवार बदलला. डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिली. विरोधात गेल्या निवडनुकीतील काँग्रेस उमेद्वार मच्छिद्र कामत यांनी बहुजन भारत पार्टी कडून उमेद्वारी दाखल केली व कायम ठेवली …..निकाल लागला. अन डॉ काळगे विजयी झाले पण मच्छिद्र कामत याना केवळ २ हजार २६९ मने मिळाली..


ती नोटा’ पेक्षा ही कमी आहेत. नोटा’ला ३ हजार ५६७ जणांनी पसंदी दिली. २३ उमेद्वार’ नोटा’ पेक्षा मागे आहेत. गेल्या निवडणुकीत ज्या उमेदवाराला ३ लक्ष ७२ हजार ३८४ मते पडली त्याच उमेदवारला पाच वर्षात केवळ २ हजार २६९ मते जी की, नोटा पेक्षा कमी आहेत..आहे की नाही कमाल..! याद ‘तेरी आएगी ..मुझको बडा सताएगी ..असेच काहीसे या उमेदवाराचे झाले.



