नांदेड। आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनानिमित्त घेण्यात आलेली २३ वी चालण्याची भव्य स्पर्धा रिमझिम पावसात देखील २८९ स्पर्धकांनी सहभाग घेतल्यामुळे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण संयोजनाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून ११ विजेत्यांना मोबाईल तर ३३ स्पर्धकांना आकर्षक स्मृतीचिन्ह व सर्वांना टी-शर्ट मोफत देण्यात आले.
भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, अमरनाथ यात्री संघ यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.श्रीराम सेतू गोवर्धन घाट नांदेड येथे रविवारी सकाळी सहा वाजता भाजपा महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांच्या हस्ते भाजपाचा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ विविज्ञ ॲड.प्रवीण आयाचित, मुकेश पटेल, सुधीर आंबेकर, राजू बच्चेवार, साईनाथ पदमवार, सुभाष वळबे, सुरेश इंदुरकर, गणेश गुरुपवार, सूर्यकांत सुवर्णकार यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रमुख अतिथींचा सिरोपाव व मोत्याच्या माळा देऊन श्रीकांत मुखेडकर,व्यंकट वायगावकर, विनोद अलमपल्लेवार, कविता गरुडकर, अलका पाटील, माया डिग्रसे, सचिता अलमपल्लेवार, ज्योती वाघमारे, माधुरी सुवर्णकार, विजया पावडे, प्रतिभा गादेवार, सुमती कुलकर्णी, सविता बच्चेवार यांनी सत्कार केला.नागरिकांना चालण्याची सवय लागून त्यांचे आरोग्य उत्तम राहावे हा स्पर्धा घेण्यामागचा उद्देश असल्याचे प्रतिपादन संयोजक दिलीप ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविकात केले.२३ वी अमरनाथ यात्रा ५ जूलैला व २४ वी अमरनाथ यात्रा १८ जुलैला नांदेड येथून रवाना होणार आहे.
अवघड असणारी अमरनाथ यात्रा सुखकर व्हावी यासाठी अमरनाथ यात्री संघाकडून सर्व यात्रेकरूंची पूर्वतयारी दरवर्षी करण्यात येते.त्यामध्ये एक तास पायी चालण्याचा सराव आणि पंधरा मिनिटे प्राणायाम करण्यात येतो. यात्रेकरूंची तयारी कितपत झाली याची चाचपणी या चालण्याच्या स्पर्धेमध्ये करण्यात येते. सर्व स्पर्धकांना यावेळी पहिल्यांदाच टी-शर्ट देण्यात आले होते. अकरा विविध वयोगटात या स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येक स्पर्धकांनी दोन किलोमीटर अंतर पूर्ण केले. विविध गटातील स्पर्धेला अमर शिखरे पाटील,अशोक गरुडकर, डॉ. शिवाजी डिग्रसे, केदार मालपाणी, डॉ. जीवन पावडे, डॉ. द्वारकादास नखाते, योगश पटेल,डॉ. उत्तम इंगळे ,राजू बच्चेवार,राजेश यादव,सविता काबरा यांच्या हस्ते प्रत्येकी एकदा झेंडा दाखवून स्पर्धा सुरू झाली.रिमझिम पावसात देखील स्पर्धकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेमध्ये रेखा भत्ताने,अक्षय हुरणे,मृदुला पत्की,डॉ स्मिता डिग्रसे,संतोषअप्पा चेणगे,संजिवनी चव्हाण ,उमेश खांदाजे,डॉ.गणपतराव जिरोनकर,संचाली हाके,अरविंद नाईक यांनी प्रथम क्रमांक पटकावून कच्छवेज गुरुकुल नवा कौठा यांच्यातर्फे ठेवण्यात आलेले मोबाईल मिळविले.तसेच प्रत्येक गटातील यशस्वी तिघांना मंगल कार्यालय व टेन्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह परदेशी यांच्यातर्फे आकर्षक स्मृतीचिन्ह देण्यात आले.निता दागडीया, शाम हुरणे,सुजाता आंबेकर,सारीका कोत्तावार,सिंधू शिंदे, दत्तामय बारसे,रमेश फुलारी,विठ्ठल कदम सर,प्राची टापरे.माधव गंडमवार,अक्षय हंमद यांनी आपापल्या गटात दुसरा क्रमांक मिळविला.
सुभाष देवकत्ते ,सुषमा हुरणे.सारीका केंद्रे,रेखा भताणे,रमेश वाघमारे.जयमाला लटपटे,कनक चौहान ,राम टारपे,कुशब काळे यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. माध्यम प्रतिनिधी साठी ठेवण्यात आलेल्या गटामध्ये आंनद सोनटक्के,संजय गायकवाड,सुधाकर सोळंके यांनी विजय मिळविला. रेखा भताने यांनी दोन गटात विजय मिळविला होता परंतु वेगळ्या गटातील एका महिलेने आक्षेप घेतल्यामुळे खेळाडू वृत्ती दाखवत आपले बक्षीस तिला दिले.
लंगर साहब गुरुद्वाराचे बाबा सुबेकसिंघजी, बालासाहब कच्छवे, विजयसिंह परदेशी, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा महामंत्री महामंत्री शशिकांत पाटील, एन्जॉय स्विमिंग ग्रुप चे अध्यक्ष ॲड. चिरंजीलाल दागडिया, माजी नगरसेविका जयश्री ठाकूर, तुकाराम गायकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.स्पर्धेचे धावते वर्णन रवी ढगे, रामेश्वर वाघमारे यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केल्यामुळे स्पर्धेची रंगत वाढली.
मुख्य पंच म्हणून अरुणकुमार काबरा, प्रकाश उंटवाले, वंदना मालपाणी यांनी तर समय पाल म्हणून राजु निरणे, सुरेश शर्मा,विशाल मुळे,लक्ष्मीकांत जोगदंड चोख कामगिरी बजावली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजेशसिंह ठाकूर, संतोष भारती,सचीन बनसोडे,गंगाधर पिटलेवाड,शिशुपालसिंह अग्नीवंशी,प्रकाश कोत्तावार, बबन अन्नपूर्णे, विष्णू हराळे, के.जी.काळे,यांनी परिश्रम घेतले. अमरनाथ यात्रेला दरवर्षी लाखो भाविक संपूर्ण भारतातून जातात. पण फक्त दिलीप ठाकूर हेच शारीरिक व मानसिक पूर्वतयारी गेल्या तेवीस वर्षापासून करून घेत असल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.