शिवणी, भोजराज देशमुख|महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या सिमेवर घनदाट जंगलात असलेले श्री शिखर कैलास टेकडी नर्मदेश्वर मंदिर येथील


श्री प.पू.संत श्री लिंबाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 5 डिसेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीत भव्य दिव्य 23 व्या वार्षिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे


5 डिसेंबर ते 9 डिसेंबर दरम्यान उत्सवाचे आयोजन 23 व्या वार्षिक उत्सवाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा श्री प.पू.संत लिंबाजी महाराज यांचे आह्वान दररोज महाप्रसादाचे आयोजन



किनवट तालुक्यातील शिवणी पासून जवळच असलेल्या मैजे दयाळ धानोरा हद्दीत घनदाट जंगलात 9 किलोमीटर अंतरावर श्री शिखर कैलास टेकडी नर्मदेश्वर मंदिर या ठिकाणी दिनांक 5 डिसेंबर 2025 शुक्रवार रोजी श्री प.पू.संत श्री लिंबाजी महाराज यांच्या हस्ते अग्नी स्थापना प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे

दिनांक 5 डिसेंबर 2025 शुक्रवार रोजी सकाळी 9 ते 10 शोभा यात्रा/ गणपती पुजन पुण्याह वाचन बिज अंकूरण/ मंडप पुजन
दिनांक 6 डिसेंबर 2025 शनिवार रूद्रभिषेक व आरती मंडप पुजन, ब्राह्मण पुजा, अग्नीस्थापना होम हवन व प्रसाद
दिनांक 7 डिसेंबर 2025 रविवार रूद्रभिषेक व आरती मंडप पुजा, ब्राह्मण पुजा होम हवन व प्रसाद
दिनांक 8 डिसेंबर 2025 सोमवार रूद्रभिषेक व आरती मंडप पुजा, ब्राह्मण पुजा,होम हवन व आरती महिला मंडळाद्वारे दिवा व आरती लक्ष्मणशक्ती पारायण कार्यक्रम
दिनांक 9 डिसेंबर 2025 मंगळवार 108 कलशाव्दारे महारूद्राभिषेक व आरती ह.भ.प.भिमराव महाराज फुठाणकर यांचे काल्याचे किर्तन गुरूभोग संत श्री लिंबाजी महाराज व सुरेश महाराज यांचे प्रवचन मंडप पुजा, ब्राह्मण पुजा होम हवन व पुणाआहोति व धर्मगुरू बाल ब्रह्मचारी संत तपस्वी डॉ.रामराव महाराज यांचे गुरुभोग व महाप्रसाद कार्यक्रम राहील.
या उत्सवा काळात श्री बालाजी लिंबाजी जाधव रमेश बळिराम जाधव, बालासाहेब देशमुख,ईदंल राठोड यांच्याशी संपर्क साधावा दिनांक 5 डिसेंबर ते 9 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या 23 व्या वार्षिक उत्सवाच्या काळात भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री शिखर कैलास टेकडी नर्मदेश्वर मंदिर चे मुख्य पुजारी श्री.प.पु. संत श्री लिंबाजी महाराज यांनी केले आहे


