नांदेड जिल्ह्यात धनादेश अनादराची २३ प्रकरणे तडजोडीने निकाली

विशेष लोकन्यायालयातून २९.४४ लाख रुपयांची वसुली

NNL Team
By NNL Team

नांदेड| महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नरेंद्र के. ब्रम्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणांसाठी विशेष लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले. या लोकन्यायालयात एकूण २३ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली असून २९ लाख ४४ हजार १५६ रुपयांची वसुली करण्यात आली.

विशेष लोकन्यायालय यशस्वी होण्यासाठी वकील आणि बँक अधिकाऱ्यांच्या पूर्वनियोजित बैठका घेण्यात आल्या. तसेच तालुकास्तरीय न्यायाधीशांशी आभासी (ऑनलाईन) बैठकीद्वारे समन्वय साधून नियोजन करण्यात आले.

लोकन्यायालयात दोन्ही पक्षांच्या संमतीने प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. त्यामुळे संबंधितांचा वेळ, श्रम आणि न्यायालयीन खर्च वाचण्यास मदत झाली. तसेच न्यायदानाची प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि परिणामकारक ठरली.

या विशेष लोकन्यायालयाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा व तालुका न्यायालयांतील न्यायाधीश, कर्मचारी, शिपाई, जिल्हा न्यायालयाचे अधीक्षक, व्यवस्थापक तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातील सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद जी. देशपांडे यांनी विशेष लोकन्यायालयाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

ठळक मुद्दे

  • धनादेश अनादराची २३ प्रकरणे तडजोडीने निकाली
  • ₹२९,४४,१५६ रकमेची वसुली
  • नांदेड मुख्यालयासह सर्व तालुका न्यायालयांमध्ये विशेष लोकन्यायालय
  • न्यायालयीन वेळ, खर्च व श्रमांची बचत; जलद न्यायदानाला चालना
Share This Article
Follow:
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Leave a comment
error: Content is protected !!