Water Problem : लोहा शहराचा पाणीप्रश्न सुटला; लिंबोटी धरणातून सुनेगाव तलावात पाणी सोडले

पोलीस बंदोबस्ताची मागणी; पाणी मार्गावर २० कर्मचाऱ्यांची तैनाती

NNL Team
By NNL Team

लोहा| लोहा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सुनेगाव तलावाने तळ गाठल्याने शहरावर गंभीर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले होते. मात्र आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पुढाकाराने आणि नगराध्यक्ष शरद पवार, उपनगराध्यक्ष करीम शेख व नगरसेवकांच्या पाठपुराव्यामुळे लिंबोटी धरणातून सुनेगाव तलावासाठी पाणी सोडण्यात आल्याने शहरावरील जलसंकट तात्पुरते टळले आहे.

सुनेगाव तलावातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. यानंतर नगराध्यक्ष शरद पवार, उपनगराध्यक्ष करीम शेख आणि नगरसेवकांनी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची भेट घेऊन लिंबोटी धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली. आमदार चिखलीकर यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी चर्चा करून परिस्थितीची माहिती दिली. नगर परिषदेनेही याबाबत आवश्यक पत्रव्यवहार केला.

या पाठपुराव्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी १५ जुलै रोजी जलसंपदा विभागाला लिंबोटी धरणातून सुनेगाव तलावासाठी एक दलघमी पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार शनिवारी (१८ जुलै) कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले. लिंबोटी धरणावर नगराध्यक्ष शरद पवार, उपनगराध्यक्ष करीम शेख, माजी उपनगराध्यक्ष केशवराव चव्हाण, हरिभाऊ चव्हाण, भास्कर पवार व नगरसेवकांच्या उपस्थितीत उपअभियंता कामठाणे यांनी पाण्याचा विसर्ग सुरू केला.

पाणी मार्गावर २० कर्मचाऱ्यांची ड्युटी – कालव्यातून येणाऱ्या पाण्याची चोरी किंवा अडथळा होऊ नये, यासाठी मुख्याधिकारी संदीप भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष नियोजन करण्यात आले आहे. पाणीपुरवठा अभियंता शरद राहेरकर, कार्यालयीन अधीक्षक उल्हास राठोड, पाणीपुरवठा प्रमुख वैजनाथ शेटे आणि कर्मचाऱ्यांकडे या कामाची जबाबदारी देण्यात आली आहे.

सकाळी १० ते रात्री १० या वेळेत पाणी मार्गावर २० कर्मचाऱ्यांची तैनाती करण्यात आली असून आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्ताचीही मागणी करण्यात आली आहे. नगराध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले की, “वेळप्रसंगी पोलीस बंदोबस्ताच्या सहाय्यानेही तलावात पाणी सुरक्षित पोहोचविण्यात येईल. शहरवासीयांना पाणीटंचाई भासू देणार नाही.”

पाण्याचे मोठे संकट टळले – आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पुढाकारामुळे लोहा शहरावरील पाणीटंचाईचे संकट टळले आहे. नगराध्यक्ष शरद पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी वेळेवर पाठपुरावा करून आवश्यक पत्रव्यवहार केला. पावसाने ओढ दिलेली असतानाही आणि धरणातील मर्यादित पाणीसाठ्यातून सुनेगाव तलावासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे शहरातील नागरिकांनी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, नगराध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

Share This Article
Follow:
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Leave a comment
error: Content is protected !!