नांदेड। जिल्हयातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नदिड यांचे “ऑपरेशन फ्लश ऑऊट” नुसार कार्यवाही चालु आहे. त्यानुसार नांदेड शहरात अवैध शस्त्र बाळगणारे आरोपीतांची माहीती काढुन त्यांचेविरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक स्थागुश्शा, नांदेड यांनी शहरात अवैद्य अग्नीशस्त्र बाळगणारे आरोपीताविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत पोउपनि / मिलिंद सोनकांबळे यांचे पथकास आदेश दिले होते.
दिनांक 28/08/2024 रोजी स्थागूशा चे पोउपनि / मिलिंद सोनकांबळे यांना गूप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, पुर्णा रोडवर, नांदेड येथे टाटा सफारी चारचाकी वाहन क्रमांक एम एच 26 ए बी 5167 मधील इसमांकडे गावठी पिस्टल व जिवंत काडतुस आहेत अशी माहीती मिळाल्याने त्यांनी तशी माहीती वरीष्ठांना दिली.
आणि पथकाने सापळा रचुन आरोपी नामे 1) प्रेमजितसिंघ ऊर्फ पाप्या पि. करतारसिंघ लांगरी, वय 24 वर्ष, रा. गुरुव्दारा गेट नंबर 1, नांदेड 2) अमरदिप सिंघ तरणजितसिंघ शिंदे, वय 20 वर्ष, रा. पाढागाव ता. केळापुर, जि. यवतमाळ ह. मु. गुरुव्दारा गेट नंबर 6 नांदेड यांना त्यांचे टाटा सफारी चारचाकी वाहन क्रमांक एम एच 26 ए बी 5167 सह ताब्यात घेवुन पंचासमक्ष झडती घेतली असता, त्यांचे वाहनात एक अग्नीशस्त्र (गावठी कट्टा) व 01 जिवंत काडतुस असा एकुण किंमती 25,600/- रुपयाचा मुद्देमाल व त्यांचे ताब्यातील टाटा सफारी कार किंमती 5,00,000/- रुपयेची जप्त करण्यात आली आहे. नमुद आरोपीतां विरुध्द पोलीस ठाणे भाग्यनगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. मिळुन आलेल्या आरोपीतांना पोलीस ठाणे भाग्यनगर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री उदय खंडेराय, पो. नि. स्थागूशा नांदेड, पोउपनि / मिलिंद सोनकांबळे, पोलीस अमंलदार माधव केंद्रे, बालाजी यादगीरवाड, शिलराज ढवळे, विजय तोडसाम, दिपक ओढणे, राजु सिटीकर यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.