नांदेड| तन, मन, आत्मा आणि बुद्धी यांची सांगड घालणारा, तसेच निरोगी तन आणि शांत मनाची गुरुकिल्ली म्हणजे ‘योग’ तन आणि मन तंदुरुस्त राखण्यासाठी योगाचे महत्व अनन्यसाधारण आहे. उत्तम व संतुलित आरोग्य राखण्यास योग उपयुक्त आहे. देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री.नरेंद्रजी मोदीजींच्या संकल्पनेतून आजचा दिवस “हा जागतिक योग दिन” म्हणून जागतिक स्तरावर साजरा केला जातो. या आरोग्यदायी दिनाच्या औचित्याने आज “शैक्षणिक प्रतिष्ठान सहयोग सेवाभावी संस्था विष्णुपुरी नांदेड व भारतीय जनता पार्टी नांदेड दक्षिण यांच्या संयुक्त विद्यमाने येथे भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


भारतीय जनता पक्षाचे नेते तथा राज्यसभेचे खासदार डॉ. अजितजी गोपछडे, भारतीय जनता पक्षाचे मराठवाडा विभागीय संघटनमंत्री श्री. संजयजी कौडगे, सहयोग सेवाभावी संस्था विष्णुपुरी नांदेड चे सचिव तथा भारतीय जनता पार्टी नांदेड दक्षिण चे जिल्हाध्यक्ष डॉ संतुकराव हंबर्डे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. चैत्यनबापू देशमुख, श्री. बालाजीराव बच्चेवार, श्री. महेश उर्फ बाळु खोमणे, आशुतोष जोशी, राजेश केंद्रे, चंचल सिंघ जठ, अमोल ढगे,दीपक यादव, आशुतोष धर्माधिकारी,नीरज चव्हाण व अनुभवी योगशिक्षक सौ नंदिनी चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हे योग शिबिर पार पडले.

कार्यक्रमाची सुरुवात इंदिरा कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांनी विविध योगासने सादर करून केली. विद्यार्थ्यांनी योगाभ्यासाचे सादरीकरण करत त्याचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे फायदे विशद केले. त्यांनी विध्यर्थ्याना योगाचे महत्त्व, त्याची शास्त्रीय बाजू आणि दैनंदिन जीवनातील उपयोग याविषयी माहिती दिली.पतंजलि च्या योग शिक्षिका सौ नंदिनी चौधरी यांनी सुद्धा योगासणाचे धडे दिले.



या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना राज्यसभेचे खासदार डॉ. अजितजी गोपछडे म्हणाले, “योगामुळे शरीर सुदृढ, मन शांत आणि जीवन शिस्तबद्ध होते. भारत हा योगाचा जनक आहे आणि आज संपूर्ण जगात भारतामुळे योगदिन साजरा केला जातो, ही आपल्या साठी अभिमानाची बाब आहे.”त्यांनी विद्यार्थ्यांनी योगसाधनेचा नियमित अभ्यास करून आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ ठेवावे असे आवाहन केले.

या प्रसंगी कॉलेज ऑफ एज्यूकेशनचे प्राचार्य डॉ बालाजी गिरगावकर,इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ विजय नावघरे, मॅनेजमेंट कॉलेजच्या संचालिका डॉ. गजाला खान, पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉ. ईशान अग्रवाल व श्री. शिवानंद बारसे, बी सी ए कॉलेजचे प्राचार्य सुनील हंबर्डे, मदर तेरेसा नर्सिंग स्कूलचे प्राचार्य श्री. सुनील पांचाळ, इंदिरा स्कूलचे प्राचार्य विक्रम ढोणे,प्राशसकीय अधिकारी विश्वनाथ स्वामी, इंदिरा कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या प्राचार्य डॉ भार्गवी,फार्मसी विभागप्रमुख डॉ. सूर्यकांत जाधव, प्रा. राजेश क्षीरसागर यांच्या सह मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षकवर्ग तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी उत्साहाने सहभाग घेत योगदिनाचे महत्त्व अधोरेखित केले.
शेवटी आयोजकांच्या वतीने सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले.

