Yoga makes the body strong : योगामुळे शरीर सुदृढ, मन शांत आणि जीवन शिस्तबद्ध होते- डॉ. अजितजी गोपछडे
नांदेड| तन, मन, आत्मा आणि बुद्धी यांची सांगड घालणारा, तसेच निरोगी तन आणि शांत मनाची गुरुकिल्ली म्हणजे 'योग' तन आणि मन तंदुरुस्त राखण्यासाठी योगाचे महत्व अनन्यसाधारण आहे. उत्तम व संतुलित आरोग्य राखण्यास योग उपयुक्त आहे. देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री.नरेंद्रजी मोदीजींच्या संकल्पनेतून आजचा दिवस "हा जागतिक योग दिन" म्हणून जागतिक स्तरावर साजरा केला जातो. या आरोग्यदायी दिनाच्या औचित्याने आज "शैक्षणिक प्रतिष्ठान सहयोग सेवाभावी संस्था विष्णुपुरी नांदेड व भारतीय जनता पार्टी नांदेड दक्षिण यांच्या संयुक्त विद्यमाने येथे भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय जनता पक्षाचे नेते तथा राज्यसभेचे खासदार डॉ. अजितजी गोपछडे, भारतीय जनता पक्षाचे मराठवाडा विभागीय संघटनमंत्री श्री. संजयजी कौडगे, सहयोग सेवाभावी संस्था विष्णुपुरी नांदेड चे सचिव तथा भारतीय जनता पार्टी नांदेड दक्षिण चे जिल्हाध्यक्ष डॉ सं...
