नांदेड| आज दि. ०७ ऑगस्ट रोजी प्रा.आ. केंद्र मुगट येथे ” जागतीक स्तनपान सप्ताहाचे ” आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रम दि. ०१/०७/२०२५ ते ०७/०७/२०२५ पर्यंत गरोदर स्त्रीया, स्तनदा माता, 0 ते ०६ महीण्याचे बालके यांची आशा, आरोग्य सेविका व समुदाय आरोग्य अधिकारी यांचे मार्फत घरोघरी भेटी देवून तपासणी करण्यात आली. गरोदर मातेला व स्तनदा मातेला आहाराचे व स्तनपानाचे महत्व समजावून सांगण्यात आले, योग्य पध्दतीने स्तनपान करणे, बाळाला पुरक आहार या बद्यल मार्गदर्शन करण्यात आले.


सदरील कार्यक्रमास उदघाटक म्हणून राहुल कर्डीले साहेब जिल्हाधिकारी नांदेड, श्रीमती मेघना कावली मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, अनन्या रेडडी मॅडम प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी, डॉ.संगीता देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी, प्रशांत थोरात बालविकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड, आनंद देऊळगावकर साहेब तहसिलदार मुदखेड, डॉ. शिवशक्ती पवार जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी नांदेड, श्रीकांत देशमुख साहेब गटविकास अधिकारी मुदखेड, डॉ. संजय कासराळीकर तालुका आरोग्य अधिकारी मुदखेड, श्रीमती शिवगंगा घोंडगे बालविकास प्रकल्प अधिकारी मुदखेड, तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी, सर्व आशा कार्यकर्ती व परिसरातील माता व बालके यांची मोठ्या संख्येने उपस्थीती होती.


जागतीक स्तनपान सप्ताहाच्या दरम्यान मेघना कावली मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड यांच्या मार्गदर्शना नुसार महिलांसाठी हिरकणी माता पुरस्कार व बालकांसाठी बाळकृष्ण पुरस्कार घोषीत करुन मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमा दरम्यान समुदाय आरोग्य अधिकारी यांनी मातांना स्तनपानाचे महत्व समजवण्यासाठी पथ नाटयाचे सादरीकरण केले. तसेच आरोग्य सेविका श्रीमती वाघमारे यांनी व आशा श्रीमती संगीता आठवले यांनी स्तनपानाचे महत्व विषद करणारे गीत सादर केले.



समारोपपर भाषनामध्ये श्री राहुल कर्डीले साहेब जिल्हाधिकारी यांनी स्तनपानाचे महत्व विषद करण्या बरोबरच या पुढे ही अशाच प्रकारे माता व बालकांच्या आरोग्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे सुचविले तसेच केलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त करुन मुदखेड आरोग्य विभागाचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालूक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यीका, सर्व आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ती यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेश बदनापुरकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. संजय कासराळीकर यांनी केले.



