नांदेड। अंश फर्टीलिटी अँन्ड टेस्ट ट्युब बेबी सेंटर जिथे होते नवीन आयुष्याला सुरूवात अशी टॅगलाईन घेऊन शहरातील सम्राटनगर भागात कार्यरत झालेल्या अंश आयव्हीएफ अँन्ड फर्टीलिटी सेंटरच्या स्थापनेमुळे अनेक दाम्पत्यांना लाभ होत असल्याची माहीती संचालिका .शिल्पा संतोष बोमनाळे यांनी दिली आहे.
महिलेच्या गर्भाशयाचे अस्तर, ओव्यूलेशन, फॅलोपियन ट्यूब ची स्थिती, स्त्रीबीज आणि शुक्राणूंची गुणवत्ता, इतर आजार, मिसकॅरेज चा इतिहास असा सर्व प्रकारे डिटेल स्टडी केला जातो. त्यानंतर आयव्हीएफ ची गरज आहे का आणि कोणत्या प्रकारच्या आयव्हीएफ ची गरज आहे हे ठरवून आयव्हीएफ केले जाते.
टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय?
टेस्ट ट्यूब बेबी म्हणजेच आय.व्ही.एफ. तंत्राज्ञान. हे एक ऍडवान्सड फर्टिलिटी तंत्रज्ञान आहे. टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया समजून घेण्यापूर्वी नैसर्गिक गर्भधारणा कशी होते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. नैसर्गिक गर्भधारण प्रक्रियेमध्ये ओव्हरीज मधून एग्ज रिलीज होतात आणि फेलोपियन ट्यूब कडे पाठविले जातात. येथे स्त्रीबीज आणि शुक्राणू यांचे फर्टिलायझेशन होते आणि गर्भधारणा होते. जेव्हा नैसर्गिकरित्या गर्भधारणा होऊ शकत नाही तेव्हा टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रियेचा वापर केला जातो. या प्रक्रियेमध्ये स्त्रीबीज आणि शुक्राणू योग्य वेळी कलेक्ट केले जातात, आणि ऍडवान्सड लॅब मधील इन्क्युबेटर्स मध्ये फर्टीलाइज केले जातात. यावेळी तयार केलेला भ्रूण/एम्ब्रियो स्त्री च्या गर्भाशयात ट्रान्स्फर केला जातो. या प्रक्रियेत बाळाचा पुढील विकास आणि वाढ अगदी नैसर्गिक रीतीने होतो. या संपूर्ण प्रक्रियेतून जन्मलेल्या बाळाला टेस्ट ट्यूब बेबी म्हणतात.
टेस्ट ट्यूब बेबी आणि आय.व्ही.एफ. मधील फरक?
बऱ्याचदा टेस्ट ट्यूब बेबी आणि आय.व्ही.एफ. मधील फरक अनेकांना लक्षात येत नाही. दोन्हींमध्ये एक साम्य असे आहे की, दोन्ही प्रक्रियांमध्ये स्त्रीबीज आणि शुक्राणू यांचे मिलन प्रयोगशाळेत केले जाते. सुरुवातीच्या काळात टेस्ट ट्यूब मध्ये स्त्रीभ्रूण तयार केला गेला त्याला ”टेस्ट ट्यूब बेबी” म्हणतात. जसजसा काळ गेला तसतसा तंत्रज्ञानाचा विकास होत गेला आणि स्त्रीभ्रूण टेस्ट ट्यूब ऐवजी ”इन्क्युबेटर” मध्ये बनविला गेला; या प्रक्रियेला इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आय.व्ही.एफ.) म्हणतात.आयव्हीएफ काय आहे? आयव्हीएफ म्हणजे ‘इन विट्रो फर्टिलायझेशन’. ‘इन विट्रो’ म्हणजे शरीराच्या बाहेर आणि ‘फर्टिलायझेशन’ म्हणजे गर्भाधान. आयव्हीएफ प्रक्रियेमध्ये स्त्रीबीज आणि शुक्राणू एका आधुनिक प्रयोगशाळेत जोडले जातात आणि गर्भ बनवला जातो…
ICSI मध्ये प्रगत तंत्र…!
प्रगत ICSI मध्ये गर्भाधान आणि गर्भाचा विकास अनुकूल करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रांचा समावेश आहे…
प्रगत ICSI चा कोणाला फायदा होतो?
प्रगत ICSI विशेषतः यासाठी फायदेशीर आहे:
जटिल पुरुष वंध्यत्व: गंभीर पुरुष घटक वंध्यत्व असलेल्या व्यक्ती (उदा. एनेजॅक्युलेशन, ऑब्स्ट्रक्टिव्ह ॲझोस्पर्मिया, खराब शुक्राणूंची गुणवत्ता).
मागील IVF अयशस्वी: पारंपारिक IVF पद्धतींनी यशस्वी गर्भाधान न केलेले जोडपे.
अनुवांशिक तपासणी आणि निवड: गर्भाची अनुवांशिक चाचणी आवश्यक असलेली प्रकरणे (PGT-A किंवा PGT-M).
……डॉ.शिल्पा संतोष बोमनाळे , आयव्हीएफ स्पेशालिस्ट , अंश आयव्हीएफ अँन्ड फर्टीलिटी सेंटर ….०२४६२ – २८५१८५ , ७७७६९९२२५० , ९६७३६६९५९५