नांदेड। नारायणा प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित ‘आम्ही जरांगे’ गरजवंत मराठ्यांचा लढा हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीस येत आहे. मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या ज्वलंत चळवळीला मोठ्या पडद्यावर या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला.
आणि आज नांदेड शहरात आम्हीं जरांगे या चित्रपटाची पुर्ण टीम प्रेक्षकांच्या भेटीला आली होती यावेळी नांदेड येथिल हॉटेल आकृती येथे पत्रकार परिषद घेऊन संवाद साधण्यात आला सोबतच सकल मराठा समाज बांधवाना हितगुज साधत चित्रपटाचं प्रोमोशन करण्यात आलं. यावेळी चित्रपटात 22 वर्षा चे जरांगे पाटील यांची भुमिका निभावणारे चित्रपटाचे नायक पृथ्वीराज थोरात तसेच चित्रपटाचे निर्माते डॉ दत्ता मोरे, कामाजी पवार,डॉ संजय कदम,पंजाब काळे पाटील,सौं कल्पना डोंगळीकर,नानाराव कल्याणकर, उद्धव सूर्यवंशी,सतिश जाधव,प्रल्हाद दुरपडे,माधवराव ताटे,संकेत पाटील, तिरुपती भगणूरे, सुभाष कोल्हे, दशरथ कपाटे,सुनिल कदम,बालाजी वाघमारे,बालाजी शिरफुले,सदा पुयड, गोविंद कदम, बंडू पाटील, गणेश कोकाटे,नवनाथ जोगदंड यासह सकल मराठा समाज नांदेड तसेच सर्व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी
‘आम्ही जरांगे’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद सुरेश पंडित यांचे असून मागील अनेक वर्षापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या चळवळीसाठी आपल्या जीवाचे बलिदान देणारे मराठा क्रांतिवीर यांचा न पाहिलेला इतिहास पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर येत असल्याने प्रेक्षकांसाठी ही एक वेगळीच पर्वणी असणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतच “गरजवंत मराठ्यांचा लढा” हा आता फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नसून तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचला आहे. त्यामुळे अर्थातच ‘आम्ही जरांगे’ या चित्रपटाविषयीची उत्सुकता प्रदर्शना आधीपासूनच शिगेला पोहचली आहे.सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे मराठा सेवक श्याम पाटील वडजे यांनी तर आभार निर्माते डॉ दत्ता मोरे यांनी केले.