‘आम्ही जरांगे’…मराठा आरक्षणाची संघर्षगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर -NNL
नांदेड। नारायणा प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित 'आम्ही जरांगे' गरजवंत मराठ्यांचा लढा हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीस येत आहे. मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या ज्वलंत चळवळीला मोठ्या पडद्यावर या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला.
आणि आज नांदेड शहरात आम्हीं जरांगे या चित्रपटाची पुर्ण टीम प्रेक्षकांच्या भेटीला आली होती यावेळी नांदेड येथिल हॉटेल आकृती येथे पत्रकार परिषद घेऊन संवाद साधण्यात आला सोबतच सकल मराठा समाज बांधवाना हितगुज साधत चित्रपटाचं प्रोमोशन करण्यात आलं. यावेळी चित्रपटात 22 वर्षा चे जरांगे पाटील यांची भुमिका निभावणारे चित्रपटाचे नायक पृथ्वीराज थोरात तसेच चित्रपटाचे निर्माते डॉ दत्ता मोरे, कामाजी पवार,डॉ संजय कदम,पंजाब काळे पाटील,सौं कल्पना डोंगळीकर,नानाराव कल्याणकर,...
