देगलूर, गंगाधर मठवाले| लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये देगलूर विधानसभा मतदारसंघांमध्ये 50 टक्के पेक्षा कमी मतदान झालेले एकूण 25 मतदान केंद्रात असून त्यापैकी देगलूर शहरांमध्ये एकूण 10 मतदान केंद्र आहेत . प्रस्तुत 10 मतदान केंद्रात स्वीपद्वारे लक्ष केंद्रीत करण्यात येत असुन या भागात विविध उपक्रम राबवीण्यात येत आहेत.
त्यामुळे देगलूर शहरांमध्ये जास्तीत जास्त मतदार जनजागृती व्हावी तसेच लोकांमध्ये मतदान महत्व व प्रक्रियेविषयी जनजागृती करण्यासाठी भव्य मतदार जन जागृती रैलीचे आयोजन करण्यात आले होते. देगलूर शहरातील साधना हायस्कूल , सावित्रीबाई फुले हायस्कूल , प. पु . गोळवलकर गुरुजी विद्यालय, पूजा पब्लिक स्कूल , मौलाना आझाद उर्दू स्कूल, ज्ञानसरस्वती इंग्लिश स्कूल व देगलूर शहरातील सर्व शाळेतील दोन हज़ार विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रस्तुत रैलीमध्ये शहरातील प्रतिष्ठित नागरिक, प्राध्यापक, शिक्षक अधिकारी, कर्मचारी व मतदार उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार भरत सूर्यवंशी यानी उपस्थित सर्वाना मतदानाची शपथ दिली.व प्रा. बालाजी कतूरवार यानी सर्व विद्यार्थ्याना आजी आजोबा, आई, वडील, काका काकू व शेजारी याना मतदान विषयी आग्रह धरण्याचे आवाहन केले. यावेळी गट शिक्षण अधिकारी डी के तोटरे यानी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी स्वीप कक्ष सदस्य , तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. महात्मा गांधी पुतळा ते तहसील कार्यालय अशी मतदार जनजागृती रॅली काढन्यात आली.