हिमायतनगर| तालुक्यातील पाचशिव महादेव फाटा येथे पार्श्वनाथ महादेव यात्रेनिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागात अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन होणे हे अत्यंत कौतुकास्पद असून, विशेषतः व्हॉलीबॉलसारख्या खेळामुळे युवा तरुण वर्गाची शारीरिक जडणघडण होण्यास मोठा वाव मिळतो, असे तालुका आरोग्य अधिकारी धम्मपाल मुनेश्वर यांनी केले.


यात्रेनिमित्त आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धांचा शुभारंभ तालुका आरोग्य अधिकारी डॉ धम्मपाल मुनेश्वर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, सध्याच्या मोबाईल आणि तंत्रज्ञानाच्या युगात तरुण पिढी खेळापासून दूर जात असून अशा क्रीडा स्पर्धांमुळे युवकांना व्यसनांपासून दूर ठेवण्यास मदत होते. खेळामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक आरोग्य, संघभावना आणि शिस्तही विकसित होते.याप्रसगी वैद्यकीय अधिकारी डॉ रमाकांत देशमुख, डॉ शिवशंकर बुरकुले, डॉ सरकुंडे यांची ऊपस्थीती होती.

६जानेवारी रोजी झालेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत हिंगोली, परभणी, यवतमाळ, निर्मल, नांदेड आदी जिल्ह्यांतील जवळपास २१ संघांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धा अत्यंत चुरशीच्या झाल्या असून प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. स्पर्धेचा अंतिम सामना अतिशय रोमांचक झाला. या स्पर्धेत हिमायतनगर संघाने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपदाचा मान मिळवला, तर मलकजाम संघाने द्वितीय आणि दयाळ धानोरा संघाने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक चषक व पारितोषिके प्रदान करण्यात आली.दुपारी सुरू झालेली व्हॉलीबॉल स्पर्धा विदुत रोषणाई मध्ये रात्री ९.१५ वा संपन्न संपन्न झाली.


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी यात्रा समिती, क्रीडा प्रेमी तरुण, व्हाॉलीबॉल स्पर्धा समितीचे अध्यक्ष गजानन बुरकुले, पवन आडे,बोथगे,शुभम संगनवार ,विजय अंभोरे, रवि भालेराव , सोनु आडे,अरुण जाधव, अंकुश जाधव, रामेश्वर बोडके, परमेश्वर आहिरवाड, बन्टी राऊत , बंडु वानखेडे , पोलिस पाटील विलास डवरे,कॅनल इन्स्पेक्टर अमोल जाधव,विशेष परिश्रम घेतले. शेवटी आयोजकांनी सर्व सहभागी संघांचे, पंचांचे व प्रेक्षकांचे आभार मानले. बक्षीस दाते सरपंच सुनील शिरडे, सुभाष आडे, राठोड ,मुरलीधर अनगुलवार यांचाही गौरव करण्यात आला.


