Sunday, May 24

Tag: in the physical development of the youth

Volleyball : व्हॉलीबॉलमुळे युवा वर्गाची शारीरिक जडणघडण घडते – डॉ धम्मपाल मुनेश्वर 

Volleyball : व्हॉलीबॉलमुळे युवा वर्गाची शारीरिक जडणघडण घडते – डॉ धम्मपाल मुनेश्वर 

नांदेड, स्पोर्ट्स
हिमायतनगर| तालुक्यातील पाचशिव महादेव फाटा येथे पार्श्वनाथ महादेव यात्रेनिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागात अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन होणे हे अत्यंत कौतुकास्पद असून, विशेषतः व्हॉलीबॉलसारख्या खेळामुळे युवा तरुण वर्गाची शारीरिक जडणघडण होण्यास मोठा वाव मिळतो, असे तालुका आरोग्य अधिकारी धम्मपाल मुनेश्वर यांनी केले. यात्रेनिमित्त आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धांचा शुभारंभ तालुका आरोग्य अधिकारी डॉ धम्मपाल मुनेश्वर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, सध्याच्या मोबाईल आणि तंत्रज्ञानाच्या युगात तरुण पिढी खेळापासून दूर जात असून अशा क्रीडा स्पर्धांमुळे युवकांना व्यसनांपासून दूर ठेवण्यास मदत होते. खेळामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक आरोग्य, संघभावना आणि शिस्तही विकसित होते.याप्रसगी वैद्यकीय अधिकारी डॉ रमाकांत देशमुख, डॉ शिवशंकर ब...
error: Content is protected !!