हिमायतनगर,अनिल मादसवार। मुदखेड आदीलाबाद ब्रॉडगेज रेल्वे लाईनवर असलेल्या हिमायतनगर रेल्वे स्थानकाला दि 25 रोजी (सिपीएम ) सेंट्रल प्रोजेक्ट मॅनेजर यांनी भेट देऊन स्थानकावरील चालू असलेल्या विकास कामाची पाहणी केली. रेल्वेस्थानकावर स्वागत कक्ष स्थापन करून तेथे स्वागत कमान उभारण्यात येणार असून, त्याच बरोबर डिवायडर बसवून अंतर्गत रस्त्याचा विकास करण्यात येणार असल्याने हिमायतनगर रेल्वे स्थानक आता हायटेक स्थानक होणार आहे. आखण्यात आलेल्या अंदाज पत्रकानुसार कामांना गती देऊन हिमायतनगर रेल्वे स्थानकाच्या नाविनिकरणाचे काम जलद गतीने पूर्ण करावे अश्या सूचना संबंधितांना दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत रेल्वेचे अधिकारी, अभियंता व इतर कर्मचारी उपस्थित होते.


हिमायतनगर हे शहर तेलंगणा आणि विदर्भाच्या सीमेवर वसलेले असल्याने येथे दोन्ही प्रांतातील लोक खरेदीसाठी येतात, हिमायतनगर रेल्वे स्थानकावरून व्यापारी खरेदीसाठी मोठया शहराला व देवस्थान दर्शनासाठी जातात. मात्र हिमायतनगर रेल्वे स्थानकावर सुपरफास्ट एक्स्प्रेसला थांबा नसल्याने नांदेडसारख्या रेल्वे स्थानकावर जाऊन मोठी एक्स्प्रेस पकडावी लागते. रेल्वे स्थानकावर गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छतागृहे, पोलीस चौकी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बसण्यासाठी आसन व्यवस्था, एक्स्प्रेस गाड्यांचा थांबा, प्रतिक्षलय, शेड यांसह अनेक मागण्या केल्यानंतर हिमायतनगर येथील रेल्वे स्थानकाच्या नविनिकरणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून कायापालट केला जात असून, यासाठी रेल्वे मंत्र्यांनी 23 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यामुळे आता इलेक्ट्रॉनिक लाईटवर रेल्वे चालू झाली असून, रेल्वे स्थानकाचे नवीनीकरणाचे काम सुरू आहे. आगामी काळात हिमायतनगर रेल्वे स्थानकावर प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.



सहा महिन्यापूर्वी रेल्वे स्थानकाच्या निकृष्ट कामाबद्दल पत्रकारांनी आवाज उठवल्यानंतर विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीती सरकार यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली. त्यांनी कामाचा दर्जा वाढविण्याच्या सूचना ठेकेदारांना केल्या होत्या तेव्हापासून येथील स्थानकावरील विकास काम थांबूनच आहेत. सदरील काम लवकरात लवकर सुरू करून येथील स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी हिमायतनगर रेल्वे स्थानकावर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, धनबाद एक्स्प्रेस गाडीला थांबा, डेमो गाडीचे डब्बे वाढवा, स्थानकावर महिलांसाठी प्रतिक्षालाय सुरू करा, अपंग प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्यात यासह ईतर मागन्या पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष दत्ता शिराने यांनी शनिवार दि 22 जून रोजी हिमायतनगर रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यासाठी आलेल्या नांदेड रेल्वे डिव्हिजच्या विभागीय व्यवस्थापक निती सरकार यांच्याकडे सर्व प्रवासी व गावकऱ्यांच्या वतीनं मांडल्या होत्या.


यानंतर (सिपीएम) रेल्वेच्या सेंट्रल प्रोजेक्ट मॅनेजर यांनी आदिलाबाद, किनवट दौऱ्यावरून नांदेड जाताना हिमायतनगर रेल्वे स्थानकास दि 25 रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास भेट दिली. यावेळी त्यांनी रेल्वे स्थानक परिसराची पाहणी करून कश्या पद्धतीने बांधकाम, रस्ता, ऑटो व बसथांबा, इमारतीचे मुख्य प्रवेशवद्वारा, कमान, सवग कक्ष, प्रतिक्षालय, शौचालय, कैंटीन आदींच्या नियोजन संदर्भात सूचना दिल्या. त्याच बरोबर डिवायडर बसवून अंतर्गत रस्त्याचा विकास करून प्रवाश्याना रेल्वे स्थानकावर सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा होण्यासाठी स्थानकाचे काम सुरू असल्याचे सांगितले. एकूणचं त्यांच्या दौऱ्यामुळे हिमायतनगर येथील रेल्वे स्थानकाचे रखडलेल्या विकास काम लवकर मार्गी लागलं अशी अपेक्षा हिमायतनगर रेल्वेस्थानकावरुन प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवासी व शहरवाशी नागरिकांना आहे.



