Homeक्राईमillegal sand transport : अवैध रित्या वाळूची चोरटी वाहतूक करणारा हायवा जप्त,...

illegal sand transport : अवैध रित्या वाळूची चोरटी वाहतूक करणारा हायवा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

नवीन नांदेड| ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी दुसऱ्या दिवशीही विष्णुपुरी येथील गोदावरी नदीच्या काळेश्वर मंदिर नवीन पुलाजवळ अवैध रित्या वाळू चोरणाऱ्या विना नंबर हायवा मधुन पाच ब्रास रेती असा 50 लाख मुद्देमाल जप्त करून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या कार्यवाही मुळे अवैध रित्या वाळू चोरणाऱ्या मध्ये खळबळ उडाली आहे.

अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैधरित्या गौण खनिजाची (रेती) चोरटी वाहतुक करणाऱ्या लोकांवर कारवाई करणे बाबत सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले आहे. त्या अनुषंगाने ओमकांत चिचोलकर पोलीस निरीक्षक ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी, अंमलदार पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय माहिती मिळाली, त्यावरून दिनांक 14ऑगस्ट 25 रोजी 04.25 वाजता विष्णुपूरी जाणाऱ्या रोडवरील काळेश्वर मंदिराजवळील नवीन ब्रीजजवळ गेले. दोन इसम एका विना नंबरच्या हायवा मध्ये अवैध रेतीची चोरटी वाहतुक करीत असतांना मिळून आले.

सदरची हायवा व त्यातील 05 ब्रास अवैध रेती (गौण खनिज) असा एकूण 50,25,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी पोलिस कर्मचारी शंकर माळदे यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दोघां विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी ओमकांत चिंचोलकर, उपनिरीक्षक बाबुराव चव्हाण, पोलीस कर्मचारी संतोष जाधव,खलील बेग देवेंद्र शिरमलवार,हाणवंता कदम,शंकर माळगे अंमलदार यांनी केलेल्या कामगीरीचे अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments