मुदखेड/नांदेड| नांदेड जिल्ह्यातील मुदखेड शहरात युवक काँग्रेसच्या वतीने आज दि. 06 ऑगस्ट रोजी जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील गाढे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या रुमणे मोर्चाला तालुक्यातील शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्य जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन रुमणे मोर्चात सहभाग घेतला.


युवक काँग्रेसच्या वतीने बालाजी गाढे पाटील यांनी मुदखेड तालुक्यातील शेतकरी जनतेच्या विविध मागण्यांना घेऊन शहरातील बाळासाहेब ठाकरे चौक ते तहसील कार्यालय असा रुमणे मोर्चा आयोजीत केला होता. त्यात प्रामुख्याने शेतीविषयक, वीजेच्या समस्यांसंदर्भात व रस्ते तसेच निराधार, वृद्ध व अपंग घटकांच्या मागण्या शासनाच्या बहिऱ्या कानांपर्यंत पोहोचवण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी आर कदम, प्रदेश सरचिटणीस श्रावण रॅपनवाड, तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख, शहराध्यक्ष कैलास गोडसे, राजअप्पा कोत्तावार, तेजाबराव पाटील मुंगल, करीम खानसाब, म. गौस, माधव हामंद, मुजीब पठाण, खालिद कुरेशी, दादाराव पुयड, राजेश पवार, विश्वनाथ पवार, श्रीनिवास महादवाड हे सहभागी होते.


यात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, पिकविम्याचे पैसे तातडीने खात्यात जमा करावेत, शेतकऱ्यांना पिककर्ज विना अडथळा दिले जावे, रस्ते खड्डेमुक्त करण्यात यावेत, थ्री फेस लाईट दिवसा आणि सलग 12 तास मिळावी, शेतातील सिंगल फेस लाईटची व्यवस्था तातडीने करावी, गावातील व शेतीतील सिंगल फेस लाईट 24 तास देण्यात यावी, कोटेशन भरलेल्या शेतकऱ्यांना तातडीने डिपी देण्यात यावेत, मुदखेड येथे 132 केव्हीचे उपकेंद्र तातडीने उभारण्यात यावे, मुदखेड तालुकयात अजून चार 33 केव्ही उपकेंद्रांची निर्मिती करण्यात यावी, एक गाव एक लाईनमेन, रेशनवाटप सुरु करावे, वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे होणारे नुकसान थांबवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरील होल्ड काढण्यात यावेत, कर्जमाफी योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमुक्ती करण्यात यावी, निराधार, अपंग व वृद्ध या दुर्बल घटकांना मिळणारे मानधन तातडीने वितरीत करण्यात यावे, शेतकऱ्यांना ठिबक व शेती उपयोगी साधनांसाठी शंभर टक्के अनुदान दिले जावे, शेतकऱ्यांना उत्पन्न खर्च आधारीत दुप्पट हमीभाव देण्यात यावा, पांदण रस्ते करण्यात यावेत अशा एकोणीस मागण्यांचा समावेश आहे.

हा मोर्चा ठरल्याप्रमाणे शहरातील बाळासाहेब ठाकरे चौक येथून सुरु होऊन शिवाजी महाराज चौकातून तहसील कार्यालयावर गेला. इथे प्रताप देशमुख, कैलास गोडसे, तेजाबराव पाटील मुंगल, गंगाधर हंबर्डे यांनी मनोगत व्यक्त केले तर या मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या बालाजी गाढे यांनी सविस्तर भूमिका मांडताना सरकार वर सडकून टीका करत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. यावेळी मानव मुक्ती मिशन या संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष केतन देशमुख व संभाजी ब्रिगेडचे सतीश व्यवहारे यांनी आपले जाहीर पाठींब्याचे पत्र संयोजक बालाजी गाढे यांना दिले.

यानंतर एक पाच पानांचे सविस्तर असे निवेदन शिष्टमंडळामार्फत तहसीलदारांना देण्यात आले. सदरील मोर्चाला तालुक्यातून मोठ्या संख्येने शेतकरी, जनसामान्य, वृद्ध, अपंग बांधव उपस्थित होते. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी युवक काँग्रेसचे संतोष कपाटे, ज्ञानेश्वर मगरे, प्रशांत मुंगल, संभाजी गाढे, शिवम मगरे, विलास कल्याणे, केतन देशमुख, शरद पवार, साहिल शेख, महेश पवार, अविनाश चौदंते, बापूजी गाढे, करण गाढे, हणमंत लखे, संदीप पवार, प्रविण पवार, माधव गाढे, अविनाश चमकुरे, मारोती गाढे, तिरुपती मगरे, शहाजी गाढे, शुभम मगरे, हनुमंत चमकुरे, राज धुमाळे, निळकंठ पुप्पलवाड, कपिल बट्टेवाड, शंकर अवुलवार, संदेश मलदोड, सुभाष सावंत, यांनी अथक मेहनत घेतली.