Unprecedented response of Youth Congress to Balaji Gadhe’s Farmer Rumane Morcha : युवक काँग्रेसचे बालाजी गाढेच्या शेतकरी रुमणे मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद -NNL
मुदखेड/नांदेड| नांदेड जिल्ह्यातील मुदखेड शहरात युवक काँग्रेसच्या वतीने आज दि. 06 ऑगस्ट रोजी जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील गाढे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या रुमणे मोर्चाला तालुक्यातील शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्य जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन रुमणे मोर्चात सहभाग घेतला.
युवक काँग्रेसच्या वतीने बालाजी गाढे पाटील यांनी मुदखेड तालुक्यातील शेतकरी जनतेच्या विविध मागण्यांना घेऊन शहरातील बाळासाहेब ठाकरे चौक ते तहसील कार्यालय असा रुमणे मोर्चा आयोजीत केला होता. त्यात प्रामुख्याने शेतीविषयक, वीजेच्या समस्यांसंदर्भात व रस्ते तसेच निराधार, वृद्ध व अपंग घटकांच्या मागण्या शासनाच्या बहिऱ्या कानांपर्यंत पोहोचवण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी आर कदम, प्रदेश सरचिटणीस श्रावण रॅपनवाड, तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख, शहराध्यक्ष कैलास गोडसे, राजअप्...
