उस्माननगर, माणिक भिसे। लोहा तालुक्यातील येळी येथील गोदावरी नदी घाटावर अवैध वाळू उपसा होत असल्याच्या माहितीवरून कंधार उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांचे मार्गदर्शन खाली महसूल पथकाने धडक कारवाई करत अवैध वाळू उपसा करून दोन जेसीबी मशीने दोन टिप्पर भरताना पकडून दंडात्मक कारवाईसाठी उस्माननगर पोलीसाच्या ताब्यात देण्यात आली आहेत.
लोहा तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर असलेले व शेवटच्या टोकावरील येळी पुला लगत अवैध वाळू उपसा सुरू होता. त्यावरून उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी अचानक बुधवारी सांयकाळी लोहा महसूलचे धडक कारवाई पथकाने अवैध वाळू उपसा करून दोन जेसीबी मशीनने टिप्पर मध्ये भरताना दोन जेसीबी मशीन व दोन वाहने पकडली.
त्यात टिप्पर क्रमांक एमएच २६/एडी १०५२ व एमएच ०४/ईवाय ७९४७ ही वाहने पुढील दंडात्मक कारवाई होई पर्यत उस्माननगर पोलिसाच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती तलाठी मनोज जाधव यांनी दिली. या पथकात मंडळ अधिकारी चंद्रशेखर सहारे, तलाठी मोतीराम पवार, संतोष अस्कुलकर ,मनोज जाधव ,मदैवाड आदींचा समावेश होता.