नांदेड। नांदेड शहरातील इस्लामपुरा हरुनबाग येहे मोकळया प्लॉटचे जागेवर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कोण्यातरी कारणावरुन अब्दुल मन्सुर पिता अब्दुल रहीम वय ३७ वर्षे रा. हरुनबाग यांचे डोक्यात मागचे बाजुने, उजवे चाळयाचे वरील भागात कोणत्यातरी धारधार हत्याराने मारुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले. या घाणेला पोलिसांनी गांभीर्याने घेऊन तपास केला या खुनाच्या गुन्हयातील अज्ञात दोन आरोपीना इतवारा पोलीसांनी १८ तासात अटक केली असता सदर खुन हा अनैतिक संबंधाच्या कारणावरून झाला आहे असे तपासात निष्पन्न झाले आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दिनांक १५.०६.२०२४ रोजी २३.०० वा. ते दिनांक १६.०६.२०२४ चे ०१.०० वा. चे दरम्यान हरुनबाग नांदेड येथे एजाज भाई यांचे घराचे तिनचार घराचे पुढे मोकळया प्लॉटचे जागेवर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरुन अब्दुल मन्सुर पिता अब्दुल रहीम वय ३७ वर्षे रा. हरुनबाग इस्लामपुरा नांदेड यांचे डोक्यात मागचे बाजुने, उजवे चाळयाचे वरील भागात कोणत्यातरी धारधार हत्याराने मारुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले आहे. वगैरे वरुन पो.स्टे. इतवारा गुरनं. २२०/२०२४ कलम ३०२ भादंवी प्रमाणे नोंद करण्यात आला. सदर खुन हा अनैतिक संबंधाच्या कारणावरून झाला आहे असे तपासात निष्पन्न झाले आहे. सदरचा गुन्हा अज्ञात आरोपी विरुध्द अज्ञात कारणासाठी व अज्ञात हत्यार वापरलेला गंभीर स्वरुपाचा होता. त्यामुळे पोलीसांपुढे मोठे अव्हान होते. घटनास्थळी वरीष्ठ पोलीस अधिकारी, पो.स्टे. इतवारा येथील प्रभारी अधिकारी रणजित भोईटे पो.स्टे. इतवारा गुन्हे शोध पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांनी स्टाफसह भेट दिली.


सदरचा गुन्हा हा अपरात्री विरळ वस्ती मध्ये अंधाऱ्या भागात घडला होता व पोलीसांपुढे आव्हान निर्माण इ गाले होते. गुन्हयातील मयताची ओळख पटवल्यानंतर आरोपी बाबत कोणत्याही प्रकारचा सुगावा लागत नसल्याने मा. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मा.अपर पोलीस अधीक्षक अविनाशकुमार साहेब, खंडेराय धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, उप विभागिय पोलीस अधिकारी सुशिल कुमार नायक, पोलीस निरीक्षक रणजित भोईटे यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. ईतवारा नांदेड येथील गुन्हे शोध पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक जाधव, पोउपनि श्री विलास पवार, सपोउपनि श्री ङिवी. बिसाडे, पोहेकॉ /६६४ मोहन हाके, पोहेकॉ /७३५ ईमरान, शेख पोहेकों / ४३६ मोकले, पोना/२५४३ हवीव चाऊस, पोना/२११७ कोमुलवार, पोना/२५५६ दासरवाड, पोकों/२८९० कोरनुळे, पोकॉ/४९३ गायकवाड, पोकों/२९०८ जगताप यांनी अथक परिश्रम करुन १८ तासाचे आत आरोपी १. फैसलखॉन पिता आरेफखॉन वय २५ वर्षे, व्यवसाय व्यापार, पाण्याच्या टाकीजवळ चौफाळा नांदेङ २. खाजाखॉन उर्फ ववु पिता ताहेरखॉन वय ३० वर्षे व्यवसाय मजुरी रा. रंगारगल्ली नांदेड हे निष्पन्न करुन त्यांना ताव्यात घेतल्यावर त्यांनी गुन्हा केल्याचे सांगीतले. सदर आरोपीतांना तपासिक अधिकारी राजु चव्हाण यांचे ताव्यात देण्यात आले असुन सध्या आरोपी पोलीस कोठडीत आहेत.

सदर कार्यवाही श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक साहेव, अविनाशकुमार, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, खंडेराय धरणे साहेव, अपर पोलीस अधीक्षक भोकर, सुशिल कुमार नायक, उप विभागिय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित भोईटे, गुन्हे शोध पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक संग्राम पोउपनि विलास पवार, सपोउपनि ङिवी. विसाडे, पोहेकों /६६४ मोहन हाके, पोहेकॉ /७३५ ईमरान, शेख पोहेकॉ / ४३६ मोकले, पोहेकॉ / १९८८ मानेकर, पोना/२५४३ हवीव चाऊस, पोना/२११७ कोमुलवार, पोना/२५५६ दासरवाड, पोकों/२८९० कोरनुळे, पोकों ४९३ गायकवाड, पोकों /२९०८, पोकॉ/६५५ वेग यांनी पार पाडली आहे.
