नवीन नांदेड| नांदेडचे लोकप्रिय स्व. खा.वसंतरावजी चव्हाण यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार आदींच्या उपस्थितीत सोमवार (दि. २६) रोजी हडको बसस्थानक येथे शोकसभा आयोजन करण्यात आले होती,यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेड, आदी राजकीय पक्षासह सामाजीक, शैक्षणिक, पत्रकारीता, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे सोमवार दि. २६ रोजी पहाटेच्या सुमारास निधन झाले,दरम्यान हडको बसस्थानक येथे सिडको वाघाळा ब्लाँक काँग्रेस कमिटीचे प्रभारी बापूसाहेब पाटील यांनी सोमवार (दि.२६) रोजी सर्वपक्षीय अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते, यावेळी मनपाचे माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे, नांदेड भाजयुमो माजी शहर अध्यक्ष संजय पाटील घोगरे, भारतीय कामगार सेनेचे ब्रिजलाल उगवे, वाघाळा शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेश शिंदे, डॉ.नरेश रायेवार, शिवसेना दक्षिण तालुका प्रमुख अशोक मोरे, माजी शहर प्रमुख साहेबराव मामीलवाड, कृष्णा पांचाळ, विनोद सुत्रावे, वंचित बहुजन आघाडीचे विठ्ठल गायकवाड,


अमृत नरंगलकर, गोविंदराव पाटील घोगरे, भुजंग मोरे, गजानन कत्ते, मंगेश कदम, राजु लांडगे, शाहीर गौतम पवार, शंकरराव धिरडीकर, भि.ना. गायकवाड, शेख लतिफ, सिध्दार्थ धुतराज, शेख मोईन लाठकर, दिपक देशपांडे, मोनु जोशी, पातेवार, सचिन चाकुरकर, मधुकर भोसीकर, गजानन शिंदे, एस.पी. कुभांरे, प्रभू उरुदवाडे, यांच्या सह पत्रकार रमेश ठाकूर, संग्राम मोरे, शेख कलिम, शेख गौस, आदीसह सर्वपक्षीय पदाधिकारी व विविध क्षेत्रातील नागरीक मोठया संख्येने उपस्थिती होती. प्रारंभी आयोजक बापुसाहेब पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व स्व. खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, यावेळी दोन मिनिटे श्रध्दांजली अर्पण करण्यात आली, शोकसभेचे सूत्रसंचालन पत्रकार दिगंबर शिंदे यांनी केले.
