नांदेड| इतवारा गुन्हे शोध पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावरून अवैध गावठी कट्टा किंमती 25,000 /- रु चा मुद्देमाल जप्त करून आचारसंहिता काळात चांगली कामगीरी केली आहे. आरोपीवर गु.र.नं. 423 / 2024 कलम 3/25 शस्त्र अधिनियम, सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियमगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अवैध शस्त्र बाळगणारे व्यक्ती विरुध्द कारवाई करणे बाबत सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्या अनंषगाने दिनांक १५/११/२०२४ रोजी इतवारा पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक पो.स्टे. हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनिय माहिती मिळाली की, नविन कविता हॉटेल, बाफना टी पॉईट नांदेड येथे एक इसम कमरेला पिस्टल लावुन थांबलेला आहे.
अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जावुन मिळालेल्या माहिती मधील वर्णनाचा इसम ज्ञानेश्वर उर्फ डॅनी अनिरुध्द गाडगे वय २२ वर्ष रा. शेलगाव ता. अर्धापुर जि. नांदेड यास ताब्यात घेवुन अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यातुन एक गावठी कट्टा किंमती 25,000/- रुप्याचे हत्यार मिळुन आले आहे. त्यांने जिल्हाधिकारी साहेब नांदेड, यांचे शस्त्र बंदी आदेशाचे उल्लंघन केले आहे. याबाबत पोहेकॉ मोहन उत्तमराव हाक्के नेमणुक पो. स्टे. इतवारा नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि कारवाई अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा यांचे मार्गदर्शनाखाली, रणजीत भोईटे, पोलीस निरीक्षक पो. स्टे. इतवारा, नांदेड गुन्हे शोध पथकाचे पो.उप नि. रमेश गायकवाड, विलास पवार, पोहेकों मोहन हाक्के, धिरजकुमार कोमुलवार, पोना लक्ष्मण दासरवार, पोकों नजरे आजम देशमुख, संघरत्न गायकवाड सर्व नेमणुक पो. स्टे इतवारा, नांदेड तपास परि. पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे ने. पो. स्टे. इतवारा हे करीत आहेत. वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.