श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेेेअंतर्गत पाच कोटींच्या विकासकामांना आ.भीमराव केराम यांच्या प्रयत्नाने शासनाकडून मंजूरी मिळवल्याने मतदारसंघातील माहूर तालुक्यातील अनेक ठिकाणच्या ग्रामस्थांनी केलेल्या मागणीच्या पार्श्वभुमिवर ग्रामस्थांना दिलेला शब्द आ.केराम यांनी पाळला असल्याची भावना जनतेतून व्यक्त करण्यात येत आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सन २४/२५ या वर्षासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णय दि.३ ऑक्टोबर नुसार किनवट/माहूर विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांच्या अनुषंगाने विविध गावच्या नागरीकांनी आ. भिमराव केराम यांच्याकडे आवश्यक असलेल्या विकासकामांबाबत कामांची मागणी केली.
त्याची पुर्तता करण्याचे आश्वासन आ.भीमराव केराम यांनी दिले होते, मि बोलतो ते तोलतो हा त्यांचा शब्द कायम असुन त्यांनी नागरीकांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता केल्याने मतदारसंघातील अनेक गावातील विकास कामाकरीता ५ कोटी रूपयांच्या निधीची तरतुद शासना कडून करुन घेतल्याने तालुक्यातील वाई बाजार येथे सभामंडप बांधकाम, साकूर, अनमाळ, मालवाडा, आष्टा, आसोली, मदनापूर, रूई, नखेगाव, सायफळ, मेट येथे सी.सी. रस्ता बांधकाम, तसेच उमरा येथे सभामंडप, सिंदखेड व बोंडगव्हाण येथे समाजमंदीर बांधकाम इत्यादी ठिकाणच्या कामाचा समावेश आहे तर लवकरच या कामास सुरुवात होणार असल्याने आ. केरामांनी दिलेला शब्द पाळला असल्याची भावना समाजमनातूूून व्यक्त होत आहे.